Hot Posts

6/recent/ticker-posts

यलमार मंगेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक यशवंत सेना स्वबळावर लढविणार-आनंदराव मेटकरी

 यलमार मंगेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक यशवंत सेना स्वबळावर लढविणार-आनंदराव मेटकरी


सांगोला  (कटूसत्य वृत्त):- आगामी यलमार मंगेवाडी ता सांगोला ग्रामपंचायतीची निवडणूक यशवंत सेना स्वबळावर लढविणार असल्याची माहिती,यशवंत सेनेचे  तालुकाध्यक्ष आनंदराव मेटकरी यांनी दिली. यलमार मंगेवाडी येथील शेतकरी डाळिंब उत्पादनामुळे समृद्ध झाला आहे.परंतु गावात आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. वाडयावस्त्यांवर जायला लोकांना रस्ते नाहीत.व्यापाऱ्यांची वाहने शेतापर्यंत खराब रस्त्यांमुळे जाऊ शकत नसल्याने येथील शेतकऱ्यांना आपला शेतमाल हातगाडीवर घेऊन जावा लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.आपण सत्तेवर आल्यास सर्व वाड्यावात्यांवर पक्के रस्ते बांधून देऊ असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच चोरमाळे वाडी, चौगुले वस्ती, पाटील वस्ती येथे पाण्याच्या टाक्या बांधून तयार आहेत .परंतु अजूनही तेथील रहिवाशांना पाणी मिळत नाही.ही शोकांतिका आहे.गावातील धार्मिक स्थळे अस्वच्छ आहेत. वाचनालय सुसज्ज नाही. म्हणून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नव्या नेतृत्वाची गरज आहे.गावातील तरुण वर्ग परिवर्तनाची भाषा करू लागले आहेत. तसेच आपण गेल्या दहा वर्षांपासून सर्व समाजाला एकत्र करून सामाजिक कार्य करीत  आहे. तरुणाचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत आहे,तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून गावातील तरुण वर्ग आणि शेतकरी यांच्या पाठिंब्यावर  यशवंत सेना आगामी य. मंगेवाडी ग्राम पंचायतीच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष आनंदराव मेटकरी यांनी दिली आहे.





Reactions

Post a Comment

0 Comments