Hot Posts

6/recent/ticker-posts

केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर 50% कमी करावेत - नितीन झिंजाडे

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर 50% कमी करावेत - नितीन झिंजाडे

करमाळा (कटुसत्य. वृत्त.): केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर 50% कमी करावेत अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे यांनी केली आहे.

याबाबत करमाळा तहसीलदार समीर माने यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात आज मितीला कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाही दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरामध्ये केंद्रातील भाजप सरकारकडून दिवसेंदिवस वाढ केली जात आहे.या सततच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचे दरही वाढले आहेत.जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.गेले कित्येक महिने सर्वसामान्य जनता  ही कोरोनाच्या परिस्थितीमुळे लाॅकडाऊन व रोजगार नसल्याने हैराण झाली आहे.या जनतेला योग्य निर्णय घेऊन दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार या दरवाढीचा बोजा जनतेवर लादत आहे.

श्रीलंका देश आपल्या देशाकडून पेट्रोल इतर पेट्रोलियम पदार्थ खरेदी करत असताना भारतापेक्षा पेट्रोल, डिझेल स्वस्त आहे. याचा अर्थ निश्चितच केंद्र सरकार देशातील लोकांची आर्थिक लूट करीत आहे व ही देशातील लोकांची घोर फसवणूक आहे. यामुळे केंद्र सरकार सदरच्या इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी पदवीधर संघाच्यावतीने निषेध करण्यात येत आहे. केंद्र सरकारने ही केलेली दरवाढ तात्काळ रद्द करून पेट्रोल, डिझेल व गॅस च्या किंमती 50% ने कमी कराव्यात व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा.या निवेदनाच्या प्रति अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार, खा.सुप्रिया सुळे, माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिह निंबाळकर यांना पाठवण्यात आल्या आहेत.

सदर निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे नितीन झिंजाडे,राष्ट्रवादी पदवीधर संघ करमाळा तालुकाध्यक्ष रवींद्र वळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड.अजिनाथ शिंदे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे करमाळा तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय अडसूळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा विधानसभा अध्यक्ष भोजराज सुरवसे, सामाजिक न्याय विभागाचे महेश मोरे आदी कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments