Ads

Ads Area

12 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

12 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

सोलापूर, (क.वृ.): सामान्य जनतेमध्ये कायद्याबाबत जनजागृती होण्यासाठी आणि पक्षकारांची प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार दि.12 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता सोलापूर शहर व तालुक्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा  प्राधिकरणाचे अध्यक्ष एम.आर. देशपांडे यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात फौजदारी तडजोडपात्र,बँक वसुली, कलम 138 एन. आय. ॲक्ट, अपघात न्यायाधिकरणाबाबत, कामगार वाद, वीज व पाणी यांची देयके, वैवाहिक वाद, भूसंपादन, बँक, सहकारी बँक, सहकारी  पतसंस्था यांच्या वसुलीबाबत, बँक लवाद इत्यादी प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांबाबत राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्याय दिला जाणार आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी प्रकरणे तडजोडीने मिटवून लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close