Ads

Ads Area

राज्यस्तरीय कलासक्त अश्वघोष पुरस्कार शनिवारी होणार वितरण सोहळा

राज्यस्तरीय कलासक्त अश्वघोष पुरस्कार शनिवारी होणार वितरण सोहळा

सोलापूर (क.वृ):- राज्यस्तरीय अश्वघोष कलासक्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन शनिवार, दिनांक ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे होणार आहे अशी माहिती संयोजक आशुतोष नाटकर यांनी दिली. हा पुरस्कार वितरण सोहळा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष संतोष (भाऊ) पवार, जी.एम. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सोलापुरचे अधिक्षक अभियंता संतोष शेलार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कोषाध्यक्ष संजय ठुबे यांची उपस्थिती राहणार आहे. यंदाच्या राज्यस्तरीय कलासक्त पुरस्काराचे मानकरी लघुपट, मालिका व चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शक मोनिका सुर्यवंशी (कोल्हापूर), नाट्य व चित्रपट अभिनेत्री पल्लवी जीवनतारे (नागपूर), चित्रपट निर्माते राजकुमार हंचाटे (सोलापूर), चित्रपट, दिग्दर्शक व लेखक जितेंद्र वाईकर (पुणे), चित्रपट कला दिग्दर्शक पांडुरंग कांबळे-सावळीकर (सांगली), चित्रपट कलन व दिग्दर्शक सचिन वाघ (पुणे), चित्रपट कॅमेरामन मोहन गिरीगोसावी (चांदेकरवाडी, कोल्हापूर), चित्रपट गीत लेखनकार, प्रा.डॉ, विनायक पवार (जालना), चित्रपट निर्मिती व्यवस्थापक मंजिरी चौगुले (कोल्हापूर), नाट्य, चित्रपट अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रतिक गौतम (बीड), चित्रपट संगीत दिग्दर्शक रोहित नागभिडे (पुणे), चित्रपट दिग्दर्शक संभाजी जाधव सोलापूर) हे आहेत. याच सोहळ्यात कै. बाळासाहेब काकडे स्मृती कलास्नेह पुरस्कार २०२० चित्रपट अभिनेते काळूराम ढोबळे (पुणे), चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक संदीप पंडीत (पुणे) आणि चित्रपट अभिनेत्री साक्षी चौधरी (पुणे) यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. तर कै.

भूवनेश्वरी उमाकांत सावळगी यांच्या स्मरणार्थ अश्वघोष विशेष पुरस्कार समई नृत्यामध्ये २०२० चे विश्वविक्रम मानकरी ठरलेले मधु कांबळे, वर्ल्ड रेकॉर्डचा पुरस्कार प्राप्त लावणी नृत्य बालकलाकार विद्याश्री येमचे आणि संकल्प युथ फाऊंडेशन, सोलापूर या संस्थेचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. याच सोहळ्यात विघ्नहर्ता प्रॉडक्शन निर्मित परसुअक्का या चित्रपटाच्या पोस्टर व ट्रेझरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे संयोजन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे समारंभ समिती प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक विभाग, सोलापूरचे प्रमुख व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, उपनगरीय शाखा, सोलापूरचे सदस्य आशुतोष नाटकर यांनी केले आहे. तसेच जब्बार मुर्शद, अशोक जांभुळकर (नागपूर), पप्पू गायकवाड, रजनीकांत सोमा, धानेश सावळगी, नीलेश शंभरकर (नागपूर), धनंजय आंबेकर, किरण लोंढे, प्रशांत शिंगे, बाळकृष्ण राशीनकर, डॉ. रजनी दळवी, माधुरी डहाळे, वसुंधरा शर्मा, मनिषा माने यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. शासनाने वेळोवळी दिलेल्या सूचना व मार्गदर्शक तत्वाचे कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर आपण सामाजिक भान राखूनच कार्यक्रम यशस्वी करूया. तसेच कार्यक्रमास उपस्थित राहत असताना सॅनिटायझर व मास्क वापरणे बंधनकारक राहील.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close