Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीराजेंच कळकळीचं आवाहन

                मराठा समाजातील विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीराजेंच                                           कळकळीचं आवाहन



मुंबई : 'मराठा विद्यार्थ्यांनो EWS आरक्षण घेतल्यास SEBC आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपीठाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS आरक्षणाचा लाभ घेण्यास मान्यता दिली होती. नुकतंच उच्च न्यायालयानेदेखील मराठा समाजातील एका विद्यार्थ्यास EWS कोट्यातून शैक्षणिक प्रवेश घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र या दोन्ही न्यायालयांनी असा निकाल देत असताना स्पष्टपणे नोंदवले आहे की, जे विद्यार्थी EWS कोट्यातून प्रवेश घेतील त्यांना SEBC आरक्षणाचे कोणतेही लाभ घेता येणार नाहीत,' अशी माहिती देत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे.

'मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यानंतर काहींनी EWS आरक्षणचा पर्याय सुचविला होता, मात्र तेव्हापासून समाजाला माझे हेच सांगणे आहे की मराठा आरक्षण रद्द झाले नसून केवळ स्थगिती दिलेली आहे. मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास म्हणून सिद्ध केले असताना आपण EWS कोट्यातून आरक्षण घेतल्यास त्याचा SEBC आरक्षणाच्या कायदेशीर लढाईवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो,' असा धोका संभाजीराजेंनी व्यक्त केला आहे.

राज्य सरकारला आव्हान

'EWS चा लाभ घेतल्यास SEBC आरक्षणाला धोका पोहोचू शकतो, हे मी पूर्वीपासून सांगत आहे. यासाठी EWS आरक्षणाचा लाभ घेताना SEBC च्या आरक्षणावर कोणताही परिणाम होऊ देणार नसल्याची हमी राज्य सरकारने घ्यावी,' असं आव्हान संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला दिलं आहे. तसंच उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या या निर्णयांमुळे माझी भूमिका स्पष्टपणे अधोरेखित झाली आहे. शिवाय EWS चे 10% आरक्षण हे केवळ मराठा समाजासाठी नसून आर्थिकदृष्ट्या मागास खुल्या वर्गात असणाऱ्या सर्व समाजघटकांसाठी आहे, हेदेखील लक्षात घ्यावे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments