Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षणासाठी छत्रपती खा.संभाजीराजे यांना नितीन झिंझाडे यांचे राष्ट्रवादी कडून निवेदन

       मराठा आरक्षणासाठी छत्रपती खा.संभाजीराजे यांना    नितीन झिंझाडे यांचे राष्ट्रवादी कडून निवेदन

 

        करमाळा (क.वृ.) : - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून आरक्षण मर्यादा 50%वर आणावी यासाठी छत्रपती खा.संभाजीराजे भोसले यांनी लक्ष घालावे अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे यांनी केली आहे.

        युवराज छत्रपती खा.संभाजीराजे काल करमाळा या ठिकाणी आले असता त्यांचा सत्कार सकल मराठा समाजच्या वतीने करण्यात आला.यावेळी सदर मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले.या  निवेदनात पुढे म्हटले आहे की मराठा आरक्षणा मिळण्यासाठी  केवळ 50% असणारी मर्यादा अडचणीची ठरत आहे.आज मराठा समाजाला आरक्षणाची असणारी गरज लक्षात घेता 50%आरक्षण मर्यादा उठवणे गरजेचे आहे.सवर्ण समाजाची आरक्षणाची विशेष मागणी नसताना केंद्र सरकारने सवर्णांना 10% आरक्षण घटनादुरुस्ती करून दिलेल आहे.याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार घटनादुरुस्ती करून मराठा समजला आरक्षण देऊ शकते.कायद्याच्या कचाट्यात आरक्षनाचा प्रश्न कायमच भिजत राहणार आहे व राहिला आहे.यासाठी आपण विशेष लक्ष घालून मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करून समाजाला न्याय देणेसाठी राज्यसभेत हा मुद्दा निकाली काढावा व समाजाची आरक्षनाची मागणी पूर्ण करावी.या निवेदनासोबत दि.२१/०९/२० रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घटनादुरुस्ती करून पाठवलेल्या पत्राची प्रत सोबत जोडलेली आहे. 

        हे निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष संतोष वारे,पंचायत समिती सदस्य ऍड.राहुल सावंत,नगरसेवक प्रवीण जाधव,महादेव फंड,अतुल फंड,सचिन घोलप,प्रा.मिलिंद फंड,मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष सचिन काळे,ऍड.प्रशांत बागल,विजय लावंड,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाअध्यक्ष शिवाजी जाधव,राहुल जाधव ,विनय ननावरे,ज्योतिराम लावंड,अमोल यादव,राहुल पवार यांच्यासह सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

50%आरक्षण मर्यादा मराठा समाजाला आरक्षण देताना अडचणीची ठरत आहे.त्यामुळे केंद्र सरकारने ही मर्यादा घटनादुरुस्ती करून उठवली पाहिजे.यापूर्वी सवर्ण समाजाला 10%आरक्षण देताना व त्यांची आरक्षणाची विशेष मागणी नसताना केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून आरक्षण दिलेल आहे.याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार घटनादुरुस्ती करून मराठा समजला आरक्षण देऊ शकते यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणं ही केंद्रातील भाजप सरकारची जबाबदारी आहे.          -  नितीन झिंजाडे प्रदेश सदस्य,राष्ट्रवादी पदवीधर संघ

Reactions

Post a Comment

0 Comments