Hot Posts

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेड च्या नावाने दिशाभूल करणाऱ्यांना मतदार जागा दाखवतील - ऍड मनोज आखरे

 संभाजी ब्रिगेड च्या नावाने दिशाभूल करणाऱ्यांना मतदार जागा दाखवतील  -  ऍड मनोज आखरे ; अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांचे नाव न घेता                                        आखरेंनी लगावला टोला

        करमाळा ( क.वृ. ) : -  आपल्या स्वार्थासाठी संभाजी ब्रिगेडला सोडचिठ्ठी देणारे आज संभाजी ब्रिगेडच्या नावावर सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु दिशाभूल करणाऱ्यांना सूज्ञ मतदार त्यांची जागा दाखवून देतील असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍड मनोज आखरे यांनी टेंभुर्णी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.त्यांचा रोख अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.

        यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप ,तालुकाध्यक्ष बालाजी जगताप, जिल्हा उपाध्यक्ष शंकर जिल्हा सचिव सुहास टोणपे करमाळा तालुका संपर्कप्रमुख गणेश शिंदे, तालुका संघटक नितीन मूळे, टेंभुर्णी शहर अध्यक्ष सचिन खुळे , कुर्डवाडी शहराध्यक्ष धनराज पवार,  मराठा सेवा संघ कुर्डवाडी शहराध्यक्ष अरुण काका जगताप,  योगेश मुळे, शिवराज पवार, शंकर नागणे ,प्रशांत कौलगे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तालुकाध्यक्ष हनुमान तावरे, करमाळा तालुका अध्यक्ष अमित घोगरे, तालुका सचिव गणेश डोके, मराठा सेवा संघ करमाळा तालुका अध्यक्ष अतुल वारे पाटील, सतीश चांदगुडे , आदी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना ऍड मनोज आखरे म्हणाले की, संभाजी ब्रिगेडने समाजहिताचे उपक्रम आणि नीतिमत्ता या जोरावर जनमानसात स्थान मिळवले आहे . काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेत आपली घरे भरण्यासाठी संघटनेचा वापर केला होता. आता तेच लोक संभाजी ब्रिगेड च्या नावाने मतदारांची दिशाभूल करत आहेत. पुणे  पदवीधर मतदारसंघात इंजिनियर मनोज कुमार गायकवाड हेच संभाजी ब्रिगेड चे अधिकृत उमेदवार असून ते तरुण आणि उच्चविद्याविभूषित तसेच उद्योजक असल्यामुळे पदवीधर मतदार यांना भरघोस मतांनी निवडून येतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

        संभाजी ब्रिगेड हि संघटना छत्रपती शिवराय -शाहू -फुले -आंबेडकर तसेच बहुजन महापुरुषांच्या विचारांवर मार्गक्रमण करणारी संघटना असून बहुजन समाज ,पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडण्यासाठी विचारांचा प्रतिनिधी विधीमंडळात असणे गरजेचे होते. त्या भूमिकेतून संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरली असून संभाजी ब्रिगेडची सामाजिक-राजकीय भूमिका एकच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.इंजिनिअर मनोज कुमार गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून पदवीधर -शिक्षकांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करत असून अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. विरोधी पक्षांमध्ये बहुतांश उमेदवार हे वयोवृद्ध असल्यामुळे पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते अकार्यक्षम असणार आहेत. त्यामुळे इंजिनिअर मनोजकुमार गायकवाड हा एकच पर्याय सुशिक्षित पदवीधर मतदारांसमोर असून इंजिनिअर मनोज गायकवाड यांना प्रथम क्रमांकाचे पसंतीचे मत देऊन सामाजिक क्रांतीचे साक्षीदार होण्याचे आवाहन त्यांनी पदवीधर मतदारांना केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments