शोषण करणारे पदवीधरांना आमिष दाखवून मते मिळवू शकणार नाहीत : पुणे पदवीधर चे उमेदवार निलकंठ खंदारे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 30, 2020

शोषण करणारे पदवीधरांना आमिष दाखवून मते मिळवू शकणार नाहीत : पुणे पदवीधर चे उमेदवार निलकंठ खंदारे

 शोषण करणारे पदवीधरांना आमिष दाखवून मते मिळवू शकणार नाहीत : पुणे पदवीधर चे उमेदवार निलकंठ खंदारे

सांगोला (क.वृ.): ज्यांना कोणताही विकासाचा आराखडा नाही, पदविधारांसाठी कोणतीही संवेदना नाही,नोकरी देण्यासाठी योजना नाही, शिक्षणाच्या आणि स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सोयी निर्माण करू शकत नाहीत, ज्यांना नाडवून लाखो रुपये नोकरीत येण्यासाठी घेतले तेच आता पदविधरांचे गॉडफादर बनण्याचा प्रयत्न करताहेत, करोडो रुपये पार्ट्या आणि इतर खर्चासाठी देताहेत, खोटी आमिषे दाखवताहेत आणी आमदार होण्याचे स्वप्न बघताहेत मात्र पदवीधरांना या मतदारसंघात सुरू असलेले अनैतिक राजकीयकरण अजिबात आवडलेले नाही त्यामुळे केवळ सांगोला आणि सोलापुरातीलच पदवीधर नव्हे तर पाच जिल्ह्यातील युवक आपल्याच नावाला पसंती देत आहेत.

पुणे पदवीधर ची निवडणूक २ दिवसावर आली असताना विविध आश्वासनांचा पाऊस पडत आहे आणि कधी नव्हे इतके महत्व सांगोल्याला का आले आहे,हे देखील पदवीधर मतदार राजा जाणते आहे.  डॉ.निलकंठ खंदारे याना सुटा सोलापूर आणी सुटा कोल्हापूर या प्राध्यापकांच्या संघटनेने जाहीरपणे प्रथम पसंती क्रमासाठी पाठिंबा दिला आहे. गेली २ तपे त्यांनी चळवळीत काढली असल्याने त्यांचा पाचही जिल्ह्यात  मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे   प्रतिनिधी आणि कार्यकर्ते तालुक्यात सक्रिय झाले आहेत. लोक आपल्याला परीने त्याचा अर्थ काढत आहेत,मात्र त्यांच्या मागे निलकंठ खंदारे यांची संघटनात्मक ताकत हेच कारण असल्याचे गुपित ही लोकांना उलगडत आहे. ही निवडणूक आता निर्णायक वळणावर येऊन पोचली असून येत्या १ डिसेंम्बर रोजी उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages