महाविकास आघाडीच्या उमेदवाराना लीड देवून शैक्षणिक समस्या घेऊन पवार साहेबांना भेटणार - बाबुराव गायकवाड


सांगोला (क.वृ.): सांगोला तालुक्यातील सर्व शिक्षण संस्था चालक, शिक्षक व पदवीधर यांनी महाविकास आघाडी चे शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रा जयंत आसगावकर व पदवीधर म्हणून अरुण लाड यांना सर्वाधिक मतदान करूया आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार साहेब यांच्या दरबारी शैक्षणिक प्रश्न घेऊन शिष्टमंडळासह भेटी ला जाणार असल्याचे प्रतिपादन सांगोला ता उच्च शिक्षण प्र मंडळाचे अध्यक्ष मा बाबुराव गायकवाड यांनी केले.
जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मा ज्ञानेश्वर कोळसे पाटील यांनी विद्यामंदिर सांगोला येथे रवि दि 29 डिसेंबर रोजी महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील सर्व संस्थाचालक यांच्या आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. सभेचे प्रास्ताविक व स्वागत सांगोला तालुका शिक्षण संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष मा रमेश येडगे वकील यांनी केले. यावेळी त्यांनी छोटी व मोठी संस्था असा भेद न करता सर्वाना सोबत घेऊन जाण्याचे आवाहन केले. शेतकरी शिक्षण प्र. मंडळाचे सचिव विठ्ठलराव शिंदे यांनी सर्वांचे प्रश्न समान असल्याने ते सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आसगावकर व लाड यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या बैठकीला जत तालुका प्रतिनिधी म्हणून आलेले गुरुबसव विद्यामंदिर, संख चे महादेव राणगर , विद्याविकास मंडळ, जवळेचे सचिव लऊळकर सर,सह्याद्रीचे डॉ दिलीप इंगवले यासह विविध संस्था चालकांनी आपल्या शिक्षकाची शालेय स्तरावर बैठक घेऊन महाविकास आघाडी ला मतदान करण्याचे आवाहन केले. सभेचे सूत्रसंचालन भोरे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सावित्रीबाई फुले शिक्षण संकुल, सोनंद चे संस्था अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे पाटील यांनी केले.
0 Comments