उद्योगपती भैरवनाथ बुरांडे यांना समता गौरव पुरस्कार प्रदान


सांगोला (क.वृ.): महात्मा फुले समता परिषद पंढरपूर यांच्या वतीने उद्योगपती भैरवनाथ बुरांडे सांगोला यांना समता गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
महात्मा फुले वाडा गंज पेठ पुणे येथे दिनांक 28 नोव्हेंबर रोजी नाम. छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते समता गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर,माजी खासदार समीर भाऊ भुजबळ, पंकज भाऊ भुजबळ, डॉक्टर तात्याराव लहाने, प्रा. हरी नरके समता परिषद महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरीताई घाडगे, समता परिषद सोलापूर जिल्हाध्यक्ष हरीभाऊ गावधंरे, पंढरपूर तालुका अध्यक्ष चंद्रशेखर जाधव, मोहोळ तालुकाध्यक्ष अमोल माळी,पत्रकार सावता जाधव, तय्यब बागवान, म्हाळाप्पा शिंगाडे,राजू कोळेकर, शंकर निमकर राजेंद्र गुरव यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडला.
0 Comments