शहर काँग्रेस कमिटीने आझाद यांना केले आभिवादन
सोलापुर (क.वृ.) : - शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे पहिले शिक्षण मंत्री पै. मौलाना आझाद यांच्या जयंती निमित्त काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन आभिवादन करण्यात आले.
यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, हाजी मैनुद्दीन शेख, जाबीर अल्लोळी, माजी नगरसेवक हारुण शेख, अनुपम शहा, हासिब नदाफ, व्हि.डी.गायकवाड, लतिफ मल्लाबादकर, आरुणाताई बेंजरपे, जे.एम.शिकलगर, राजेश झंपले, रफिक चकोले, फैजुभैया शेख, संजय गायकवाड, इब्बाहिम करबुरगी, सोहेल कडेचुर, शोभा बोबे, सोमनाथ व्हटकर, रंजना ईरकर, शुकुर शेख, हाजी महेमुद शेख आदी उपस्थित होते.
0 Comments