Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळचे शहरश्रेष्ठी ठरवण्याचा पक्षश्रेष्ठीं समोर नवा पेच येत्या काळातील निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची नवी रणनीती पक्षाला कट मारणाऱ्या अनेकांचा पत्ता होणार कट

मोहोळचे शहरश्रेष्ठी ठरवण्याचा पक्षश्रेष्ठीं समोर नवा पेच येत्या  काळातील निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची नवी रणनीती पक्षाला कट मारणाऱ्या अनेकांचा पत्ता होणार कट 

                                                         नगरपरिषद रणधुमाळी भाग - 1







        मोहोळ - ( साहिल शेख ) : - येत्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच सर्वपक्षीय हालचाली पडद्याआडून सुरू झाल्या आहेत. काही दिवसापूर्वी म्हणजे महिनाभरापूर्वी मोहोळ नगरपरिषदेच्या नव्या इमारतीवरून सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. ज्या दिवशी इमारत आठवडा बाजारात नेण्याचा ठराव झाला त्याच दिवशी ती इमारत तिथे न होण्यासाठीचाही ठराव झाला होता ही गोपनीय बाब सावध असलेल्या शिवसेनेला समजायला तब्बल दीड महिना लागला. मात्र तोपर्यंत सेना भाजपने विविध आंदोलने, आरोप-प्रत्यारोप करत नगरपरिषदेची निवडणूक आल्याची चाहूल शहरवासीयांना करून दिली होती.

         तिकडे राष्ट्रवादीच्या तंबूत मात्र वेगळ्याच घडामोडी सुरू आहेत. येत्या काळात होणारी नगरपरिषदेची निवडणूकीसाठी  मोहोळ शहरातील कोणत्या स्थानिक नेत्याला आघाडी प्रमुख करायचे ? याबद्दल बराच राजकीय उहापोह झाला. या निवडणुकीसाठी ज्यांचे नाव आघाडी  प्रमुख म्हणून संभाव्यरित्या पुढे आले होते त्या  रमेश बारसकर यांच्या आघाडीप्रमुख होण्याला पक्षीय अनुकूलता निर्माण झाली होती. मात्र सध्याचे ज्येष्ठ नेते शहाजान शेख यांनाच पुनश्च आघाडीप्रमुख राहू द्या अशी मागणी लावून धरत मोहोळ नागरी पतसंस्थेत पार पडलेल्या बैठकीत काही जणांनी बारसकर यांच्या आघाडीप्रमुख होण्याला अप्रत्यक्ष विरोध केला. मात्र स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियेमध्ये रमेश बारसकर यांनी सुचवलेल्या अतुल क्षिरसागर यांनाच संधी देण्याची भूमिका राजन पाटील यांनी घेतली. शिवाय मोहोळ शहरातील नगर परीषद निवडणूकीच्या जागा निश्‍चितीसाठी देखील रमेश बारसकर यांना पाटील यांनी सर्वाधिकार दिले होते. शिवाय गत निवडणुकीत सर्वपक्षीय विरोधात स्वतंत्र मोहोळ विकास आघाडी पॅनल उभे करणाऱ्या बारसकरांना पुन्हा राष्ट्रवादीत सामावून घेत त्यांना मोहोळचा प्रथम नगराध्यक्ष होण्याची महत्त्वाची सुवर्णसंधी देखील राजन पाटील यांनी त्यांना दिली होती. शिवाय बारसकर यांच्याच मोहोळ विकास आघाडीतुन निवडून आलेल्या नगरसेवकांनाही नगरपरिषदेच्या महत्त्वाच्या समित्यांचे सभापतीपदे देखील पाटील यांनी दिली. जरी रमेश बारसकर राज्यातील राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या संपर्कात सातत्याने असले तरी मोहोळ शहर आणि तालुक्याच्या राजकारणात त्यांचे आणि राजन पाटील यांचे म्यूच्यूअल अंडरस्टँडिंग आजवर परफेक्ट ठरले आहे. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या इतर गट प्रवाहासोबत राहण्यापेक्षा राजन पाटील यांच्यासमवेतच राहण्याचा बारसकर यांचा इरादा त्यांना स्वतःला  मात्र फायदेशीर ठरला आहे.


 वास्तविक पाहता पक्षश्रेष्ठींच्या मनात जे होते ते काही पदाधिकाऱ्यांच्या मनात नव्हते ही बाब स्पष्ट होण्यासाठी मोहोळ नागरी पतसंस्थेची मिटिंग महत्त्वाची ठरली. यापुढील काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीसाठीच्या त्या कोअर कमिटीचे प्रमुख कोणाला करायचे यापेक्षा कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला द्यायची नाही याबद्दलची रणनीती आतापासुनच सुरू झाली आहे. पक्षाला कट मारून स्वतःचा दबावगट निर्माण करणाऱ्या अनेकांचा पत्ता या निवडणुकीत कट होणार आहे हे आतापासूनच जाणवत आहे.

सध्याचे राष्ट्रवादीचे शहरातील पक्षश्रेष्ठी तथा माजी उपसभापती शहाजहान शेख हे राजन पाटील यांच्या अनगरकर -पाटील परिवाराशी निष्ठावंत आणि एकनिष्ठ असलेले एकमेव जुने नेते आहेत. जरी बारसकर यांना राजन पाटील यांनी काही राजकीय बाबीमध्ये झुकते माप दिले असले तरी शहजहान शेख यांच्या अढळ राष्ट्रवादी निष्ठेवरवरचा विश्वास कधीही कमी होऊ दिला नाही. अत्यंत महत्त्वाच्या क्षणी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येऊन देखील त्यांच्या भगिनी शाहीन अब्दुल रहमान शेख यांना नगराध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण संधी राजन पाटील यांनीच दिली.
शहाजान शेख जरी पूर्वभागात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित ठेवत असले तरी शहरभर त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. गेली अनेक वर्ष राजन पाटील यांच्यासमवेत राहून त्यांनी राष्ट्रवादीची धुरा सक्षम पणे सांभाळली आहे .सत्ता असली तरीही ते पाटील यांच्या समवेत आणि सत्ता नसली तरीही पाटील यांच्या समवेतच राहण्याची त्यांची खंबीर भूमिका पक्षाला अनेकदा फायदयाची ठरली आहे. त्यामुळेच शहरातील अशा अनेक निरपेक्ष निष्ठावंतामुळे मुळेच गत पाच वर्षात राजन पाटील यांना पक्षभेदी ओळखता आले. शहरात असे करावे लागेल, तसे करावे लागेल असे म्हणून अनाहुत सल्ले रामप्रहरी देणार्‍या त्या पत्रपंडितांनी अधुनमधुन पक्षाविरोधात काम केल्याचे स्पष्टपणे जाणवू शकले. त्यामुळे येत्या काळात होणारी निवडणूक ही पक्षाच्या विजया बरोबर पक्षासोबत असणार यांच्या हितासाठी आणि पक्षाविरोधात राहणार यांच्या मुसक्या आवळण्यासाठीची असणार आहे हे मात्र नक्की.



शहरातील काही अनुभवी समजणारे ठराविक तज्ञ उपनेते यंदाही पडद्याआड विरोधी पक्षांशी संगनमत करत यावेळी राष्ट्रवादीचा पराभव होऊ शकतो अशा वल्गना करत आहेत. राजन पाटील यांचे नगर परिषदेतील संख्याबल  बहुमत काठावर असल्याने राजन पाटील यांना खंबीर निर्णय घेण्यामध्ये अपरिहार्यता निर्माण करण्याचा डाव अडीच वर्षांपूर्वी टाकला गेला. काठावर बहुमत असल्याने राष्ट्रवादीचे तीन तेरा करण्याची स्वप्ने विरोधक बघत असताना राजन पाटील यांनी अचुक टायमिंग साधत नऊ  मध्ये आणखी दोन मते वाढवत राष्ट्रवादीची ताकत नऊ नव्हे तर अकरा असल्याचे दाखवले
कारण मुत्सद्दी आणि चाणाक्ष असलेल्या राजन पाटील यांनी भाजप मधील एक आणि शिवसेनेतील एक नगरसेवक आपलासा करून त्यांचे मतदान राष्ट्रवादीच्या बाजूने वळवत विरोधी पक्षांसह पक्षातील गटबाजी करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे कुछ भी हो सकता है चाच जणु इशारा दिला. त्यामुळे विरोधी पक्षाने देखील सत्ता खेचून घेण्याच्या काड्या सुरू ठेवल्या नाहीत. जरी नगर परिषदेतील विकासकामांचा हिशोब राष्ट्रवादीतील अनेकांना अवगत असला तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील त्या वाटपाचा पक्का हिशोब पक्षश्रेष्ठींना चांगलाच ध्यानात आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments