कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय, 'या' 4 राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम
मुंबई (क.वृ.) : - कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राज्य सरकार सतर्क झालं आहे. त्यामुळेच आता पुन्हा एकदा प्रवासाबाबतचे नियम कठोर करण्यात येत आहेत. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आपल्यासोबत बाळगण्याच्या सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत.
सरकारची नवी नियमावली :
1. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक
2. महाराष्ट्रात येण्याच्या 72 तास आधी ही करोना चाचणी करावी लागेल.
3. राज्यात येणाऱ्या प्रवाश्यांकडे आरटी-पीसीआर रिपोर्ट नसेल, त्यांना विमानतळावर स्वखर्चाने करोना चाचणी करावी लागेल.
4. महाराष्ट्रात दाखल झालेल्या ज्या प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल, त्यांच्याशी संपर्क साधून आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.
5. चाचणी निगेटीव्ह असेल तर प्रवाशाला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. फोन नंबर, पत्त्यासह सर्व माहिती त्या प्रवाशाकडून घेतली जाईल.
लॉकडाऊनबाबत काय आहे सरकारची भूमिका?
लॉकडाऊनबाबत ठाकरे सरकार "वेट ॲन्ड वॉच" या भूमिकेत असल्याची माहिती आहे. रोज 5 हाजारांच्या सुमारास कोरोग्रस्त रुग्ण वाढत आहेत. प्रत्येक दिवसाच्या आकडेवारीवर सरकार कोटकोरपणे नजर ठेवत आहे. पुढच्या 15 दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्यास सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
0 Comments