राज्यात दिवसभरात 4543 रुग्ण कोरोनामुक्त ; 4132 नवीन रुग्णांचे निदान

सोलापूर (क.वृ.):- राज्यात 16 लाख 9 हजार 607 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात 4132 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 4543 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 92.48 टक्क्यांवर पोहोचले असून सध्या 84 हजार 82 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्याचा मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे. आतापर्यंत 97 लाख 22 हजार 961 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17 लाख 40 हजार 461 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8 लाख 10 हजार 267 व्यक्ती होम क्वॉरंटाइन असून 6177 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाइन आहेत.
मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 800 रुग्ण; 1,834 कोरोनामुक्त
मुंबईत दिवसभरात 800 रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 1,834 जण कोरोनामुक्त झाले. मात्र, विविध शारीरिक आजार असलेल्या 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबईत 17 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 10 हजार 539 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या 2 लाख 43 हजार 809वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 242 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 10 हजार 181 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 16 लाख 70 हजार 251 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 68 हजार 404 वर पोहोचली आहे
0 Comments