Hot Posts

6/recent/ticker-posts

खुशखबर ! डिसेंबर महिन्यात भारतासाठी तयार होणार १० कोटी 'कोरोना' वॅक्सींचा डोस

खुशखबर ! डिसेंबर महिन्यात भारतासाठी तयार होणार १० कोटी 'कोरोना' वॅक्सीनचा डोस 

नवी दिल्ली  (क.वृ.):- जगातील सर्वांत मोठी वॅक्सीन उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हटले आहे की, डिसेंबर महिन्यापर्यंत कोरोना वॅक्सीनचे 10 कोटी डोस तयार होतील. सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या वॅक्सीन प्रोजेक्टमध्ये पार्टनर आहे. या वॅक्सीनला औषध कंपनी एस्ट्रेजेनेका ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसोबत डेव्हलप करत आहे.

सुरुवातीचे डोस भारतासाठी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी म्हटले आहे की, सुरुवातीचे उत्पादन भारतासाठी होईल. नंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला वॅक्सीनला मंजुरी मिळाल्यानंतर अन्य दक्षिण आशियाई देशांमध्येसुद्धा वॅक्सीन पाठवली जाईल. सीरम इन्स्टिट्यूट वॅक्सीनचे शंभर कोटी डोस बनवणार आहे, ज्यापैकी 50 कोटी भारतासाठी आणि 50 कोटी डोस अन्य दक्षिण आशियाई देशांसाठी असतील. सीरम इन्स्टिट्यूटने आतापर्यंत वॅक्सीनचे चार कोटी डोस तयार केले आहेत.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला येऊ शकते वॅक्सीन
एक आठवड्यापूर्वी अदर पूनावाला यांनी म्हटले होते की, पुढील वर्षी जानेवारी महिन्यापर्यंत कोरोना वॅक्सीन येऊ शकते. सोबतच हीदेखील शक्यता वर्तवली होती की, वॅक्सीनची किंमत सामान्य लोकांच्या आवाक्यात असेल. अदर पूनावाला यांनी म्हटले होते की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोविड 19 वॅक्सीनसाठी इमर्जन्सी लायसन्ससाठी अप्लाय करू शकते, जे युनायटेड किंगडममध्ये ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या उमेदवारांच्या परीक्षणाच्या निकालावर अवलंबून आहे.

न्यूज 18 ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अदर पूनावाला यांनी म्हटले होते की, आतापर्यंत कोणतीही सुरक्षा चिंता समोर आलेली नाही, परंतु वॅक्सीनच्या लाँगटर्म प्रभावास समजून घेण्यासाठी आणखी 2-3 वर्षे लागतील. जगातील सर्वांत मोठ्या वॅक्सीन बनवणार्‍या कंपनीच्या सीईओने सांगितले की, डोस स्वस्त दरात लोकांना उपलब्ध केले जातील आणि यास युनिव्हर्सल इम्यूनायजेशन प्रोग्रॅममध्ये सहभागी करण्याचा प्रयत्नसुद्धा केला जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments