उद्धवजी हेक्टरी २५,००० देऊन ठाकरी बाणा दाखवा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 17, 2020

उद्धवजी हेक्टरी २५,००० देऊन ठाकरी बाणा दाखवा

 उद्धवजी हेक्टरी २५,००० देऊन ठाकरी बाणा दाखवा

तुळजापूर क.वृ.- गेल्या दोन  दिवसांत जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सणासुदीच्या काळात हातातोंडाशी आलेला घास हिरावला असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. आपल्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्याने आता कोणतेही सोपस्कार पार न पाडता  गेल्यावर्षी औरंगाबाद येथे आपण मागणी केल्याप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी तातडीने हेक्टरी ₹२५,००० देऊन आपला ठाकरी बाणा दाखवा.
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अभूतपूर्व वादळी पाऊस पडत आहे. या अनुषंगाने अनेक गावांत जाऊन पाहणी केली आहे. अभूतपूर्व पावसाने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून काढणीला आलेले व काढून ठेवलेले सोयाबीन पाण्याखाली गेले. ऊस व तूर आदी नगदी पिके आडवी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, रस्ते,पूल,बंधारे वाहून गेले आहेत तर वीज वितरण व्यवस्थेचे देखील नुकसान झाले आहे.
१५ दिवसापूर्वी पिकांची परिस्थिती अतिशय चांगली होती त्यामुळे शेतकरी या हंगामात चांगलं उत्पन्न मिळेल या आशेवर बसले होते, मात्र पावसाने त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संकटात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने अजून भर पडली आहे. नुकसानीची व्याप्ती पाहता आता यावर चर्चा न करता सरसकट मदत देणे योग्य राहील.
गेल्यावर्षी सातारा, सांगली कोल्हापूर जिल्ह्यांत महापुर आल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित शेतकऱ्यांनी घेतलेले सर्व पिकांसाठीचे २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन वर्षांसाठीचे १ हेक्टरपर्यंत बँक कर्ज माफ केले होते. तसेच नुकसानभरपाई म्हणून स्थायी आदेशाच्या पलीकडे जाऊन दुपटीने नगदी स्वरूपात मदत केली होती.
सणासुदीचे दिवस जवळ आले असताना हाता तोंडाशी आलेला घास हिरावला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. आता त्याला झालेल्या नुकसानीपोटी तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. राज्यातील कांही मंत्री सरकारकडे पैसा नाही अशी विधान करत आहेत. मात्र सरकारला महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या (जीएसडीपीच्या) ५% रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध होऊ शकते जी की अधिकचे जवळपास १ लाख ६० हजार कोटी इतकी आहे त्यामुळे पैसा नसेल तर प्रचलित पद्धतीने कर्ज काढून मदत करावी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages