Hot Posts

6/recent/ticker-posts

खेडभोसे येथील भारत झांबरे यांच्या कृषी केंद्राचे पुराच्या पाण्यामुळे झाले लाखो रुपयांचे नुकसान

 खेडभोसे येथील भारत झांबरे यांच्या कृषी केंद्राचे पुराच्या पाण्यामुळे झाले लाखो रुपयांचे नुकसान

नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा केली व्यक्त

पंढरपूर दि.१८(क.वृ.):- भारत झांबरे सर यांच्या इंडिया कृषी केंद्र, खेडभोसे ता.पंढरपूर या दुकानाचे भीमा नदीला आलेल्या महापूरामुळे झालेले अतोनाथ नुकसान, दुकान पाण्यात आहे जवळ जवळ ५० ते ६० लाखाच्या पुढे नुकसान झाले असुन, यामध्ये विविध रासायनिक खते, कीटकनाशके, बि-बियाने, द्राक्ष, दाळींब, ऊस यासह विविध पिकांवर फवारणीची औषधे, पेस्टीसाईज यासह रासायनिक, जैविक, सेंद्रीय खतांचा समावेश होता. हा माल बँकेचे कर्जे काढून, उसनवारी करुन भरला होता. पहिलाच कर्जाचा डोंगर त्यात हि भर, दुकानदाराची एकच मागनी आहे या झालेल्या नुकसानीची व या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्वरित नुकसानभरपाई मिळावी.त्याचबरोबर शेतातील पिकाचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच खेडभोसे गावातील अनेक जनांची घरे पाण्यात गेली आहेत त्यामुळे हजारो लोकांचे जणावरांसह स्थलांतर झाले आहे. 

हजारो एकर शेतीचे, शेतीमालाचे नुकसान झाले आहे, गेल्या वर्षी महापूर त्यातुन अजून शेतकरी, व्यवसायीक सावरला नाही तोपर्यंत कोरोना या रोगाची महामारी,तोपर्यंत पुन्हा महापूर शेतकरी बांधव, तसेच व्यवसायीक पुरता हवालदिल झाला आहे. कर्जाचा डोंगर होऊन बसला आहे. पूरग्रस्त नागरिकांतुन एकच मागनी होत आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्वरित नुकसानभरपाई मिळावी.

Reactions

Post a Comment

0 Comments