कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना महाबीज बियाणाचे वाटप

सांगोला दि.१८(क.वृ.): पाचेगाव बुद्रुक ता.सांगोला येथे शनिवार दि.१७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन २०२०-२१ अंतर्गत शेतकऱ्यांना महाबीजच्या फुले-रेवती या सुधारीत ज्वारी बियाणाचे वाटप करण्यात आले. सदर बियाणाचे वाटप कृषी सहाय्यक एस.डी. गवळी, शेतकरी मित्र देवाप्पा इरकर, शेतकरी मित्र रामचंद्र करांडे यांनी केले.
यावेळी सरपंच प्रमोद दौंड,विकास सोसायटी चेअरमन देवाप्पा खरात, प्राथमिक शिक्षक देवाप्पा काबुगडे,ग्राम रोजगार सेवक संजय घोडके, माजी सरपंच बाबासाहेब कांबळे, माजी उपसरपंच माणिक ढेमरे,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विठ्ठल खताळ, तंटामुक्ती समिती सदस्य सनी दौंड पाटील, प्रमोद दौंड, सतीश दौंड, राजेंद्र बिले, माणिक दौंड, तुकाराम बिले, रमाकांत घोडके, प्रताप पाटील, जालिंदर घोडके, प्रकाश पाटील, शिवराज ढेमरे, संगणक परिचालक संजय खरात, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक दौंड,अशोक कांबळे, ज्ञानू खरात व शेतकरी उपस्थित होते.
0 Comments