मोहोळ तालुक्यातील ३५ ते ४० गावांना महापुराचा फटका बसला

मोहोळ दि.१७(क.वृ.): मागील चार दिवसापुर्वी परतीच्या पावसाने जिल्ह्यासह तालुक्यात धुमाकूळ घातल्याने भीमा सह सीना नदीला महापूर आल्याने मोहोळ तालुक्यातील ३५ ते ४० गावांना या पुराचा फटका बसला आहे . सीना नदीच्या पात्रालाच मोहोळ तालुक्यात शिरापूर नजीक भोगावती नदी व नागझरी नदी मिळते . भोगावती व नागझरी नदी या दोन्ही नद्या ही आज तागायत कधी भरुन वाहिल्या नाहीत. परंतू या दोन्हीही नद्या भरून वाहिल्या आणि या दोन्ही नद्यांचा संगम सिने ला होत असल्यामुळे तिनि नद्यांचे पाणी मिळुन आलेल्या सिना नदिच्या पात्राने रौद्र रुप धारण केले. यामुळे मोहोळ तालुक्यातील हजारो एकर शेती पाण्यात वाहून गेली. तर अनेक शेतकऱ्यांचे उभ्या पिका सह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे . तरच शेकडो जनावरे व घरे वाहून गेली आहेत. तालुक्यातील शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे .या पुरामुळे मोठ्याप्रमाणात शेतीच्या पिकाबरोबरच पशुधनाची मोठी हानी झाली आहे. अनेकांची घरे उधवस्त झाली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या बाधित शेतकऱ्यांसह तालुक्यातील सर्वच शेतीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून सर्वप्रथम या परिसरामधील खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे तातडीचे आदेश महावितरण प्रशासनाला दिल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी आष्टे व अजुनसोंड या गावांना भेटी दिली. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी या बाधित गावांना भेटी देऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून सर्वप्रथम नदीकाठच्या परिसरातील खंडित झालेल्या विद्युत पुरवठा तातडीने सुरू करण्याचे आदेश महावितरण प्रशासनास दिले आहेत नदीकाठच्या शेतीबरोबरच मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून शासनाचा मोबदला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, माजी उपसभापती तथा शिवसेना तालुका उपप्रमुख बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.
0 Comments