Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार राम सातपुते यांनी दिली सवतगव्हाणला भेट

आमदार राम सातपुते यांनी दिली सवतगव्हाणला भेट

अकलूज दि.१७(क.वृ.): माळशिरस तालुक्यातील नीरा नदी तीरावर वसलेले सवतगव्हाणला माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी अचानक भेट देऊन गावाचा आढावा व पावसाने आणि पुराने उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सवतगव्हाण गावचे नेते नितीनराजे निंबाळकर,विराज निंबाळकर ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल नवगिरे, उपसरपंच अविनाश जाधव उपस्थित होते.

माळशिरस तालुक्यात झालेल्या पावसाचा कहर आणि उद्भवलेली पूर परिस्थिती यामुळे नीरा नदी तीरावरील अनेक गावांना पुराचा फटका बसला असून अनेकांना स्थलांतर करण्याची वेळ आली तर अनेकांच्या शेतीवर पावसाने घातलेला घाला आणि झालेले पिकाची नुकसान यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.आमदार राम सातपुते यांनी सवतगव्हाणला भेट देऊन तेथील परिसराची पाहणी करून गावचे नेते नितीनराजे निंबाळकर यांच्याशी चर्चा केली.

Reactions

Post a Comment

0 Comments