पुरामध्ये बेपत्ता झालेल्या शंकर बबन देवकर यांच्या कुटुंबियांना खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सांत्वन केले

मोहोळ दि.१७(क.वृ.): सीना नदीला आलेल्या महापुरामध्ये तालुक्यातील सावळेश्वर येथील शंकर बबन देवकर वय 45 हे सावळेश्वर येथील बंधारा वरून पडून पुरामध्ये वाहून जाऊन बेपत्ता झाले. त्यांचे शोध मोहीम सुरू आहे त्यामुळे देवकर कुटुंबीयांच्या घरी सांत्वनपर भेट देत खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी देवकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.पोलीस व महसूल प्रशासनाला देवकर यांच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे सूचना त्यांनी दिल्या आहेतकुटुंब याला शासनाकडून योग्य ती मदत केली जाईल असे आश्वासन खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांनी दिले.
यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, जि. प. सदस्य तानाजीराजे खताळ, भाजपचे संजय क्षिरसागर, पं. स. सदस्य समता ताई गावडे, भाजप नगरसेवक तथा शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर इत्यादीसह परिसरातील विविध पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
0 Comments