सर्वसामान्यांसाठी केलेल्या मदत कार्याचे पालकमंत्र्यांकडून जिब्राईल शेख कौतुक


मोहोळ दि.१७(क.वृ.): मोहोळ तालुक्यातील आलेल्या पुराची पाहणी पालकमंत्री ना.दत्ता मामा भरणे यांनी केली यावेळी उपस्थित राहून तेथील कुटुंबांचे झालेले विस्कळित जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासनाकडून त्वरित मदत मिळावी अशी मागणी आष्टी येथील पुरग्रस्तांनी केली. योग्य व तत्पर मदत मिळेल याची ग्वाही भरणे मामांनी दिली.
कोरोनाचा आव्हानात्मक काळ असो अथवा सध्या आलेल्या महापुराचा महाप्रलय. पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याचे औदार्य काही मोजक्याच जणांनी दाखवले. ज्यावेळेस पालकमंत्री मोहोळ तालुक्यातील गावांना भेटी देण्यासाठी आले तेव्हा कोणकोणत्या सामाजिक कार्यकर्त्यांनी माणुसकीच्या भावनेतून आणि दुर्मिळ होत चाललेल्या सामाजिक बांधिलकीतून पूरग्रस्तांना दोन वेळच्या चार घास जेवणाची सोय केली यांच्या नावांचाही उल्लेख स्थानिकांनी पालकमंत्र्यांसमोर केला. यावेळी जिब्राईल शेख यांच्याकडून पालकमंत्री दत्तात्रयमामा भरणे यांनी पूरग्रस्तांना कोणकोणत्या अडचणी आल्या ? त्यावर त्यांनी कशी मात केली ? याबाबतची सविस्तर माहिती आस्थेवाईकपणे घेतली तसेच 71 फाउंडेशन ने केलेल्या मदत कार्याचे कौतुकही केले व याच प्रकारे समाजसेवा करत राहण्याचा सल्ला ही दिला आणि तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन पुरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन यावेळी पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी केले.
आष्टे-कोळेगाव येथे देशमुख वस्तीवर बाळासाहेब गायकवाड यांनी जेवणाची सोय केली. तर याच भागातील छोट्या-मोठ्या वस्त्यांवर जाऊन मोहोळ शहरातील सतत सर्वसामान्यांसाठी झटत असलेले मोहोळ शहरातील सामाजिक युवा कार्यकर्ते जिब्राईल भाई शेख यांनीही सीना नदी काठावरील पूरग्रस्त गावांच्या वाडी वस्त्यांवर कोणतीही फोटोबाजी प्रसिद्धी न करता अल्पोपहार व जेवणाची सोय केली.काही पूरग्रस्तांना पाण्याची पाकिटे देखील पोहोच केली. पुरापासुन ते प्रत्येक भागात फिरून अडीअडचणीच्या मागोवा घेत आहेत. हे निश्चितपणे इतर नवोदीत सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उपाध्यक्ष हुजेफ शेख, निसार शेख, आरबाज सुरखी शाहिद आतार,दिलावर शेख, स्वप्नील घोडके, तेजस बागनीकर आदम शेख या कार्यकर्त्यांनी सामाजिक हातभार लावले.
0 Comments