सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी नागरिकांनी घराबाहेर पडू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 14, 2020

सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी नागरिकांनी घराबाहेर पडू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारामदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी नागरिकांनी घराबाहेर पडू नयेजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


सोलापूरदि.१४(क.वृ.): हवामान विभागाने शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवारपर्यंत (दि. 17) अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. अतिवृष्टी झाल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावेअसे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले असून जिल्हा आणि शहर आपत्ती व्यवस्थापन विभागांनी याबाबत दक्षता घेऊन उपाययोजना करण्याचे आदेशही श्री. शंभरकर यांनी दिले आहेत. जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी शोध आणि बचाव पथकेतसेच साहित्य यांची व्यवस्था करावीआपत्ती व्यवस्थापन विभागांनी सर्व कर्मचारी उपलब्ध ठेवावेतदुर्घटना घडल्यास तातडीने बचाव कार्य करावेजुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती आणि पूल याठिकाणची वाहतूक वळवावी किंवा तात्पुरती थांबविण्यात यावीअसे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांनी दामिनी लाइटनिंग अलर्ट’ अॅप डाउनलोड करावे. वीज पडण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची आगाऊ माहिती मिळण्यासाठी या ॲपचा उपयोग होणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 0217-2731012 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावाअसे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages