Hot Posts

6/recent/ticker-posts

बँका, वित्तीय संस्थांनी सक्तीने कर्जवसुली करू नये जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश

बँकावित्तीय संस्थांनी सक्तीने कर्जवसुली करू नये
जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश

 

सोलापूर, दि.13(क.वृ.)जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत काही बँकावित्तीय संस्थाबचत गट हे नागरिकांकडून सक्तीने कर्जवसुली करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भारत सरकार आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निर्देश असतानाही ही सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे. बँकांनीवित्तीय संस्थांनी, बचत गटांनी वसुलीसाठी तगादा लावणेबळाचा वापर करणेधमकावणे असे प्रकार करून कर्जवसुली करू नयेयाबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

श्री. शंभरकर यांनी आदेशात म्हटले आहे कीलॉकडाऊनच्या कालावधीत शेतीछोटे-मोठे उद्योगधंदेव्यवसायदळणवळणव्यवहार बंद होते. अद्यापही अनेक व्यवसाय बंद आहेत. या काळातील मंदीमुळे अनेकांचे रोजगार गेलेशेतकरी आर्थिक संकटात आहे. ही परिस्थिती विचारात घेऊन भारत सरकाररिझर्व बँकेने कर्जाच्या हप्ते वसुलीला सूट दिली होती. मात्र काही बँकावित्तीय संस्थाबचत गट कर्जदारांना तगादा लावून वसुली करीत आहेत. यावर निर्बंध आणण्यासाठी अग्रणी बँकेने जिल्ह्यातील राष्ट्रीयवाणिज्यसहकारी बँका, वित्तीय संस्था यांच्या वरिष्ठांची बैठक घेऊन सक्त सूचना कराव्यात. कर्जदारांना मानसिक आणि शारिरीक छळ करणाऱ्या घटना घडणार नाहीतयासाठी उपाययोजना कराव्यात.

Reactions

Post a Comment

0 Comments