सांगोला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा - चेतनसिंह केदार-सावंत

सांगोला दि.१४(क.वृ.): अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आधीच हवालदिल झालेले असताना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे हतबल शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पहाता तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पिकांसाठी 50 हजार रुपये तसेच फळबागांसाठी 1 लाख रुपये प्रमाणे हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार सावंत यांनी केली आहे.
सांगोला तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकर्यांच्या शेतातील पिकांची परिस्थिती मध्यंतरी चांगली होती. परंतु सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांत दिवसेंदिवस पावसाचा जोर अधिक असल्याने तालुक्याती अतिवृष्टीसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील बाजरी, मका, सूर्यफूल, तूर, मूग, उडीद या पिकांसह डाळिंब, द्राक्ष, पेरू या फळबागांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांमध्ये दिवसेंदिवस नैराश्याचे वातावरण निर्माण होत आहे व त्यांना भविष्याची आर्थिक चिंता भेडसावत आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेती व फळबागांचे सरसकट पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी. निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याने मदत करण्यासाठी सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पिकांसाठी 50 हजार रुपये तसेच फळबागांसाठी 1 लाख रुपये प्रमाणे हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार सावंत यांनी केली आहे.
शासनाच्या मदतीअभावी शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे झालेले नुकसान हे कधीही भरून निघणारे नाही. या परिस्थितीत राज्य सरकारने सांगोला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीकविमा नुकसान भरपाई द्यावी. तसेच नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार सावंत यांनी केली आहे.
0 Comments