Hot Posts

6/recent/ticker-posts

सोनाईच्या माने विरोधात अट्राॅसिटीचा गुन्हा दाखल

सोनाईच्या माने विरोधात अट्राॅसिटीचा गुन्हा दाखल

करमाळा दि.१४(क.वृ.):- इंदापूरतील सोनाई दूध संघ व इतर व्यवसायाचे सर्वेसर्वा असलेले अध्यक्ष दशरथ माने यांच्या विरोधात मंगळवारी करमाळा पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कर्मउद्यान शाहू कांबळे रा. सिद्धार्थ नगर, करमाळा यांनी करमाळा पोलिसात दशरथ माने याच्या विरोधात फिर्याद दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या बरोबरच नेहमीच कामानिमित्त फिरत असतो. चिवटे यांचा दुधाचा व्यवसाय असल्यामुळे सोनाई डेअरी येथे ही अनेकदा गेलो व जात असल्याने  सोनाईचे अध्यक्ष दशरथ माने मला चांगले ओळखतात. 11 ऑक्टोबर रोजी संदीप काळे हे कुठे आहेत म्हणून भाजप कार्यालयात करमाळा येथे जाऊन गणेश गोसावी यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा ते एमआयडीसी येथे सोनाई डेअरीच्या उदघाटनाला गेले असल्याचे समजले. म्हणून मी तिकडे जात होतो तेव्हा दशरथ माने यांनी मला जाती वरुन शिव्या देऊन परत इकडे दिसला तर हात पाय मोडून टाकीन असी व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत दशरथ माने इंदापूर जि पुणे यांच्या विरोधात अट्राॅसिटीचा गुन्हा नोंद झाला असून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत हिरे करत आहेत.

दशरथ माने यांना त्यांच्या इंदापूर परिसरात दादा नावानी ओळखले जाते. ते अतिशय गुंड प्रवृत्तीचे असल्याने गोरगरिब व छोटे छोटे दुध उत्पादक व व्यावसायिकांना दमदाटी करून त्यांचे शोषण करतात. आणि हे सर्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जोरावर व बेकायदेशीर मार्गानी मिळविलेल्या पैश्यांच्या जोरावर करीत असल्याची चर्चा करमाळा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चालू आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments