जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी बारंगुळेंचा जामीन फेटाळला

वैराग (क.वृ.):- मध्यस्थास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी प्रहार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांचा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी जामीन फेटाळला.
कर्जत जिल्हा रायगड येथील शिक्षकांच्या पगारावरून बारंगुळे यांनी 27 सप्टेंबर रोजी बाळासाहेब कोरके यांच्या वाढदिवसा दिवसी सर्जापूर ता. बार्शी येथील कोरके यांच्या निवासस्थाना समोर आंदोलन केले होते. यावेळी मध्यस्थीची भूमिका घेणारे प्रशांत भालशंकर यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर हे करीत आहेत.
0 Comments