महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांना संघटनेच्या पाठपुराव्यानंतर वेतनवाढ निश्चित : जिल्हाध्यक्ष कुंडलिक आलदर


सांगोला दि.१३(क.वृ.): शासनाने राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय अभियानांतर्गत तालुका लेखपाल, तालुका कार्यक्रम सहाय्यक, तालुका समूह संघटक (बीसीएम) आदी परिचारिका, आरोग्य सेविका, कंत्राटी शिपाई, यांच्या वेतनामध्ये भरघोस प्रमाणात वाढ करण्यात आली असून, किमान वेतन कायदा लागू करून रक्कम रुपये 18000 रुपये वेतन देण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. त्या लाभामधून राज्यांमध्ये 242 कोटी 53 लाख रुपयांचे देण्यात आले आहे.
त्याचा अनेकांना लाभ होणार आहे. त्यामुळे या निर्णयाबद्दल सोलापूर जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेविका, अधिपरिचारिकासह कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 8 हजार वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 18 हजार रुपये पर्यंत वेतन मिळणार असल्याचे सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक आलदर यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन सुसूत्रीकरन्याबाबत शासनाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेकांना लाभ मिळणार आहे. गेल्या आठ वर्षापासून अल्प मानधनावर परिचारिका म्हणून काम करत आहेत. कोरोना महामारीतही सर्व परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता त्यांचे अविरत कार्य सुरु आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्याचा राज्यशासन आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह असल्याचे परिचारिका वर्गामधून बोलले जात आहे.
आधी राज्यातील हजारो आशा स्वयंसेविका यांचे मानधन वाढ दिल्यानंतर आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे कार्य राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले असल्याची कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्या कडून बोलले जात आहे. तालुक्यातील विश्वविक्रमी आमदार भाई गणपतराव देशमुख, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचाऱ्यांचे अध्यक्ष अरुण खरमाटे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी सभापती संभाजी तात्या आलदर, ऍड जि प सदस्य सचिन देशमुख, सभापती राणीताई कोळवले, माय्याका यमगर, डॉ. श्रुतिका लवटे, व बाळासाहेब केदार राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष किरण शिंदे, महासचिव विजय सोनवणे, सचिव संगीता सरदार, अध्यक्ष कुंदा साहरे, संघटनेचे उपाध्यक्ष स्वप्नील गोसावी, महेश साबळे, प्रशांत भांबुर्डे, अन्नपूर्णा ढोबळे, यांनी मोलाचे सहकार्य व पाठपुरावा केला आहे. अशी माहिती राज्य संघटनेचे मुख्य प्रवक्ते कुंडलिक आलदर यांनी दिला आहे. व माजी जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी याचे स्वागत केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत.
0 Comments