Hot Posts

6/recent/ticker-posts

उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मनरेगा मधील फळ लागवडीचे व ड्रिप चे अनुदान द्या :- प्रभाकर देशमुख

उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मनरेगा मधील फळ लागवडीचे व ड्रिपचे अनुदान द्या :- प्रभाकर देशमुख


प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय खडे आंदोलन केले

सोलापूर दि.१३(क.वृ.): उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ व इतर काही गावातील दोन वर्षांपूर्वीचे फळ लागवडीचे मनरेगा योजने अंतर्गत मधील शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप त्यांच्या खात्यावर जमा केले नाही 2015 चे जैन ठिबक अनुदान शेतकऱ्यांना दिले नाही या प्रलंबित मागणीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनहित चे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक दिवसाचे खडे आंदोलन केले.  त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत असताना सदर बजार पोलीस स्टेशनचे हवालदार अजित देशमुख हे शेतकर्‍यांजवळ दहशत माजून वर्दीचा धाक दाखवून दमदाटी करून नेहमी आंदोलनकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करून मा.पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणीही ही शेतकऱ्यांच्या वतीने प्रभाकर देशमुख यांनी लावून धरलेली.

या प्रसंगी देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता देशमुख म्हणाले भाजपच्या काळात ही शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे त्यामुळे वैतागून शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीकडे सत्ता दिली याही सत्ताधाऱ्यांनी कांद्याला भाव नाही दुधाला योग्य भाव नाही थकीत एफ आर पी कारखानदार देत नाहीत आणि उत्तर तालुक्यातील 2015 चे जैन सिंचन ठिबक अनुदान दिले नाही तसेच दोन वर्षांपूर्वी चे फळ लागवड अनुदान दिले नाही त्यामुळे शेतकरी हे देशोधडीला लागले आहेत शासन मंजुरी देते परंतु त्याची अंमलबजावणी करत नाही त्यामुळे कृषी अधीक्षक यांनी यात जातीने लक्ष घालून लेखी आश्वासन दिल्याप्रमाणे पंचनाम्याची खरी शहानिशा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा सोलापूर कृषी अधीक्षक कार्यालयास कुलुप ठोकून जाब विचारू असेही देशमुख यांनी ठणकावून सांगितले. 

गेल्या सात महिन्यांपासून लॉकडाउन व कोरोना प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे अनेकांच्या कुटुंबाची उपासमार सुरू आहे त्यामुळे उत्तर सोलापूरचे कृषी अधिकारी यांनी याचा पुनरसर्वे करून खरी माहिती घेऊन ज्या संबंधित कृषी अधिकाऱ्याने खोटे रेकॉर्ड केले आहे त्याची चौकशी करून त्वरीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या खडे धरणे आंदोलन शेतकऱ्यांनी केले आहे. यावेळी शिवाजी ननवरे, नागेश ननवरे, अविनाश मिसाळ, राजेंद्र देशमुख, उल्हास गायकवाड, अनिल गायकवाड, रवी साळुंखे, नानासाहेब मोरे, वडाळा चे समाधान गायकवाड, इत्यादी असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments