मदिरा आणि मंदीरा मधील फरक सरकारला दिसत नाही का ? - महिला मोर्चा अध्यक्ष उमाताई खापरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 13, 2020

मदिरा आणि मंदीरा मधील फरक सरकारला दिसत नाही का ? - महिला मोर्चा अध्यक्ष उमाताई खापरे

मदिरा आणि मंदीरा मधील फरक सरकारला दिसत नाही का ? - महिला मोर्चा अध्यक्ष उमाताई खापरे



तुळजापूर दि.१३(क.वृ.):- मंदीरात कोरोना दिसतो बार मध्ये कोरोना दिसत नाही का ? मदिरा आणि मंदीरा मधील फरक महाविकास आघडी सरकारला दिसत नाही असा सवाल करीत भाजपा वतीने मंगळवार दि.13 रोजी सकाळी ११ वा  मंदीर भक्तांन साठी खुले करण्याचा मागणी साठी राजेशहाजी महाध्दार समोर लाक्षणिक उपोषण  करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणात किरकोळ विक्रेत्या महिला व्यापारी पुजारी बांधवान सह भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते. यात भाविक व  बांगड्या विक्रेत्या मुस्लीम महिला ही सहभागी झाल्या होत्या .

यावेळी उपोषणात सहभागी महिलांनी "मंदीर बंद उघडले बार, उध्दवा धुंद तुझे सरकार ! तिघाडी सरकारचे कारायचे काय, खाली मुडके वार पाय ! "तुझाच आम्हा आधार उघड अंबे दार उघड अंबे दार" अशा घोषणा यावेळी उपोषण कर्त्या महिलांनी दिल्या.

यावेळी बोलताना महिला मोर्चा अध्यक्षा उमाताई खापरे म्हणाल्या  मंदीरांन बाबतीत लोकांची विशेषता महिला वर्गाची भावना श्रध्दा आहे. या मंदीरांन वर हजारो कुंटुंबाचा उदारनिर्वाह चालतो तो सहा महिन्या पासुन बंद आहे. दारु विक्री बार हाँटेल सुरु मग  महाराष्ट्रातील फक्त मंदीरच बंद काअसा सवाल करीत तिर्थक्षेञ तुळजापूर चे अर्थकरण मंदिरावर अवलंबून  असल्याने पुजारी व्यापारी किरकोळ विक्रेते कुंटुंबांना गेली सहा महिन्या पासुन बंद उपासमारीस सामोरे जावे लागत असल्याने श्रीतुळजाभवानी मंदीर भक्तांन साठी खुले करावै व चर्च मशीदी ही खुल्या कराव्यात अशी मागणी यावेळी केली.

यावेळी बोलताना अर्चनाताई पाटील म्हणाल्या कि स्ञीशक्ती श्रीतुळजाभवानी चा  नवराञोत्सव महिलांचा धार्मिक भावनेश निगडीत असुन अनवाणी पायाने महिला देवीदारी येतात मंदीर अधापपर्यत न उघडल्यानै हे सरकार धार्मिक भावना न जपणारे सरकार असल्याचे यावेळी आरोप केला जयभवानीजयशिवाजी म्हणून सत्तेवर आलेल्या या सरकारला खुद्द भवानीचाच विसर पडल्याचे यावेळी म्हणाल्या नवराञोत्सव देवीदर्शन न घडणे हे राज्यातील देविभक्तांचा दृष्टीने दुर्दैवी खेदाची बाब असल्याचे सांगुन  मंदीर आम्हा भक्तांन साठी खुले करण्याचे आवाहन यावेळी केले. शेवटी श्रीतुळजाभवानी मातेची आरती करुन भाविकांची महाध्दार समोर होत जाणाऱ्या गर्दी पार्श्वभूमीवर संयोजकांनी लाक्षणिक उपोषणआटोपते घेतले.

यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी जिल्हाअध्यक्ष नितीन काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी, सतिश दंडनाईक, अर्चनाताई विनोद गंगणे, जिल्हाअध्यक्ष क्रांती थिटे, माजी नगराध्यक्षा तथा तालुकाध्यक्ष संगिताताई कदम, नगसेविका भारतीताई गवळी, मिनाताई सोमाजी, ॲड. अंजली साबळे, शैलजा मुळुक, महानंदा पैलवान, स्वाती जाधव मार्डीकर, माजी नगराध्यक्ष बापुसाहेब कणे, विशाल रोचकरी, नागेश नाईक, विनोद गंगणे, नारायण नन्नवरे, गुलचंद व्यवहारे, विशाल छञे, माऊली भोसले, विकास मलबा, दिनेश बागल, सचिन रसाळ, आनंद कंदले, सुहास सांळुके, प्रसाद पानपुडे, शिवाजी बोदले, इंद्रजित सांळुके, विजय माने, कुमार टोले, बाळासाहेब शामराज उमेश गवते, शांताराम पेंदे, बाळासाहेब भोसले, शहाजी भांजी, गिरीष देवळालकर, संजय खुरुद, सचिन ताकमोघे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages