हयातीचे दाखले डिसेंबरपर्यंत जमा करण्याचे आवाहन

सोलापूर, दि.१३(क.वृ.): जिल्ह्यातील कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे दाखले 31 डिसेंबर 2020 अखेर जमा करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रूपाली कोळी यांनी केले आहे.
ज्या निवृत्ती वेतनधारकांचे वय 1 ऑक्टोबर 2020 ला 80 वर्षे पूर्ण होत आहे, त्यांना 1 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. उर्वरित निवृत्तीवेतनधारकांनी 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत हयातीचे दाखले संबंधित राष्ट्रीयकृत बँकेत सादर करावेत. ज्यांचे दाखले वेळेत प्राप्त होणार नाहीत, त्यांनी जानेवारी 2021 पर्यंत जमा करावेत. त्यापुढील निवृत्तीवेतनाबाबत शासन नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे श्रीमती कोळी यांनी कळविले आहे.
0 Comments