Hot Posts

6/recent/ticker-posts

शासकीय, खाजगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन सादर करावी कौशल्य विकास विभागाचे आवाहन

शासकीय, खाजगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन सादर करावी कौशल्य विकास विभागाचे आवाहन

सोलापूरदि.१३(क.वृ.)जिल्ह्यातील शासकीयनिमशासकीयखाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरुष/स्त्री/ एकूण (त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1) अशी माहिती सेवायोजन कार्यालयास 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन कौशल्य विकासरोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

माहितीचा उपयोग योजनाबद्ध आर्थिक विकासात निरनिराळे प्रकल्प तयार करण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठीआवश्यक मनुष्यबळाचा अंदाज घेण्यासाठी सेवायोजन कार्यालयाला होत असतो. ही माहिती महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयनवी दिल्ली यांच्याकडे दर तिमाहीस पाठविली जाते.

त्रैमासिक विवरणपत्र (ई.आर-1) 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे. या वेबपोर्टलवर त्रैमासिक विवरण प्रत्येकी तिमाहीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड यांचा वापर करावा. प्रत्येक नोंदणीकृत आस्थापनेस युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच दिलेला आहे. त्याचा वापर करुन कर्मचाऱ्यांची माहिती तत्काळ भरून पाठवावी.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रसोलापूर 0217-2622113/2722116इमेल- solapurrojgar@gmail.com येथे संपर्क साधावाअसे आवाहनही श्री. जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments