बार्शी तालुक्यात एकाचा खून दोघांना अटक, आठ दिवसांची पोलिस कोठडी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 23, 2020

बार्शी तालुक्यात एकाचा खून दोघांना अटक, आठ दिवसांची पोलिस कोठडी

 बार्शी तालुक्यात एकाचा खून दोघांना अटक, आठ दिवसांची पोलिस कोठडी  

बार्शी (क.वृ):-  बार्शी तालुक्यातील आगळगाव ते उंबरगे या रस्त्यावर दि . २२ रोजी भर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कळंबवाडी याठिकाणी रहिवासी असलेले सेवानिवृत्त शिक्षक त्रिंबक उमाप यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला हा खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाणे येथे हजर झाले असून बार्शी तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे.आरोपींना न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे  .हा प्रकार  शेतजमिनीच्या आर्थिक वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे  .
याबाबत सविस्तर माहिती अशी, की सदर गुन्ह्याचे फिर्याद सेवानिवृत्त शिक्षक मयत त्रिंबक उमाप यांचा  मुलगा गणेश त्रिंबक उमाप यांने बार्शी तालुका पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून दोघां विरुद्धगुन्हा दाखल झाला आहे .
यावरून आरोपी बिभीषण विश्वनाथ उमाप व त्याचे वडील विश्वनाथ बाबू उमाप या दोघां बाप-लेकांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, सदर गुन्ह्यात मयत त्रिंबक उमाप हे आपल्या शेतातील उडीद पिकाची पट्टी घेण्यासाठी बार्शी बाजार समिती या ठिकाणी जात असताना आगळगाव ते उंबरगे या रस्त्यावर आगळगाव  हद्दीत हायस्कुलपुढे  आरोपी बिभीषण विश्वनाथ उमाप व त्याचे वडील विश्वनाथ बाबू उमाप या दोघा बाप-लेकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्याशी जोरदार भांडण केले.या दोघांचे जोराचे भांडण चालू असल्याचे फिर्यादीचे चुलत भाऊ सुमंत उमाप यांनी फिर्यादीस फोन वरून सांगितले असता ते तात्काळ दुसरी दुचाकी घेऊन गुन्हा झालेल्या ठिकाणी पोहोचले असता त्यांना त्यांचे वडील त्रिंबक उमाप हे  डोक्याला गभीर जखम होवुन रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले तसेच वरून दोघेही आरोपी लाथाबुक्क्यांनी दगडाने त्यांना मारत आहेत, असे दिसले. 
फिर्यादीचे वडील रक्ताच्या थारोळ्या खाली पडलेले दिसले व मयताच्या अंगावर बिभीषण विश्वनाथ उमाप बसलेला दिसला , त्यावेळी त्याच्या अंगावर रक्ताने माखलेला भगवा शर्ट व गळ्यात पांढरा गमज्या होता. तसेच त्याचे वडील विश्वनाथ बाबु उमाप हे पायावर बसलेले होते . त्यावेळी तेथे इतर लोक जमा झालेले पाहुन ते दोघे तेथुन पळुन गेले . तेथे जमा झालेल्या लोकांपैकी फिर्यादीच्या ओळखीचे मोहन पकाले , शकर माणिकराव पाटील व नागनाथ गुरुजी यांनी फिर्यादिस सांगितले की , तुझ्या वडिलांना बिभीषण विश्वनाथ उमाप त्याचे वडील विश्वनाथ बाबु उमाप यांनी आडवुन दगडाने व लाथा बुक्याने मारले. तसेच तुझे वडील आम्हाला वाचवा वाचवा असे म्हणत होते परंतु विभीषण विश्वनाथ उमाप व विश्वनाथ बाबु उमाप यानी आम्हालाही , तुम्ही पुढे सोडवायला आला तर तुमचीही विकेट उडवील , अशी धमकी देवुन आमच्या दिशेने जोरात दगडे मारू लागले . त्यामुळे आम्ही त्यांच्या जवळ जावु शकलो नाही, असे सांगितले.
त्यानंतर फिर्यादीने नागनाथ गटकळ गुरूजी , शंकर पाटील यांच्या मदतीने जखमी वडिलांना ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे उपचाराकरिता दाखल केले . परंतु डॉक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले. सदर घटनेनंतर आरोपी मुलगा व वडील दोघेही बार्शी पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर झाले असून त्यांच्यावर ती भा. दं. वि.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दोघेही आरोपी अटकेत आहे. याचा तपास बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलीस सहाय्यक निरीक्षक शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages