Hot Posts

6/recent/ticker-posts

नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी - चेतनसिंह केदार-सावंत

नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी - चेतनसिंह केदार-सावंत

सांगोला दि.१८(क.वृ.): सांगोला तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगोला तालुक्यातील सांगोला शहर, कडलास, वाढेगांव, वाटंबरे, कमलापूर, य.मंगेवाडी, नाझरा या भागातील नुकसान झालेल्या पिकांची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सांत्वन केले. नुकसानग्रस्त पिके, फळबागा, शेतकऱ्यांची घरे, विहिरी, जनावरे यांचे सरसकट पंचनामे तातडीने व्हावेत. राज्य सरकारने नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली.

भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी शनिवारी नुकसानग्रस्त सांगोला तालुक्यातील माण, कोरडा, अप्रुपा, बेलवण नदीकाठच्या भागाचा भागांचा दौरा करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. शहरी व ग्रामीण भागात रोगराई पसरू नये याची काळजी घ्या, घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू बाबत तातडीने पंचनामे करून घ्या, सर्व क्षेत्राचे पंचनामे करून घ्यावेत, कोणीच वंचित राहता कामा नये याची प्रशासननाने खबरदारी घ्यावी अशा सूचना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी प्रशासनाला दिल्या. शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ देखील तात्काळ मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेने गतिने काम करावे असे आवाहन केले. 

प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार योगेश खरमाटे, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकांसाठी प्रति हेक्टरी 50 हजार व फळबागांसाठी प्रति हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चेतनसिंह केदार सावंत यांनी केली.

अतिवृष्टीमुळे बंधाऱ्याचा भराव वाहून गेलेल्या बेले बंधाऱ्यांची पाहणी केली. तसेच पावसाने नुकसान झालेल्या वाढेगांव, वाटंबरे, कमलापूर, य.मंगेवाडी, नाझरा या भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये यासाठी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी प्रशासनाला दिल्या.

यावेळी मधुकर पवार, मेजर भारत धनवडे, माजी उपसरपंच राजाराम पवार, बाळकृष्ण येलपले, उद्धव येलपले, राजाराम पवार, संजय पवार, अमित पाटील, विकास येलपले, संजय येलपले, प्रभाकर भडंगे, अर्चना येलपले, सुभाष पवार, संभाजी पवार, भारत येलपले, पांडुरंग विभूते, गोरख काटे, भागवत खरात, दामाजी पवार, सुब्राव पवार, संतोष पवार, आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments