Hot Posts

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीमुळे पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार - प्रदेश सचिव अजयसिंह इंगवले-पाटील

अतिवृष्टीमुळे पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार - प्रदेश सचिव अजयसिंह इंगवले-पाटील

सांगोला दि.१८(क.वृ.): सोलापूर जिल्हा व सांगोला तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अजयसिंह इंगवले-पाटील यांनी रविवारी नुकसान ग्रस्त आलेगाव, संगेवाडी, मेडशिंगी, अकोला वासुद आदि गावांचा दौरा केला.या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली. शहर व ग्रामीण भागात रोगराई पसरू नये याची काळजी घ्या, जनावरांचा मृत्यू, शेतकरीची घरे, विहिरी, पाझर, तलावे, नदी पात्रातील बंधारे, याबाबत तातडीने पंचनामे करून घेण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे ही अजय इंगवले पाटील यांनी सांगितले. शासकीय मदतीपासून कोणीच वंचित राहणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, शेतकऱ्यांना पिक विमा चा लाभ मिळण्यास संबंधित यंत्रणेने तात्काळ काम करावे, सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील फळबाग व पिकांचे नुकसान झाले आहे. 

याबाबतची सर्व माहिती घेऊन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्याकडे मदतीसाठी प्रस्ताव करणार असल्याची माहिती प्रदेश सचिव अजय सिंह इंगवले पाटील यांनी केली या पाहणी दौऱ्यात विजयकुमार सूर्यवंशी, नागेश जाधव, विजयकुमार इंगवले-पाटील, खंडेराव लांडगे, सतीश भोरे, अभिजित कदम, शामराव चंदनशिवे, सोमनाथ गोडसे, दादा लांडगे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments