युगंधर संघटनेचे भीमा कारखान्यावर घटस्थापना करून नवरात्र आंदोलन

मोहोळ दि.१८(क.वृ.): भीमा सहकारी साखर करखाण्याने थकीत ऊस बिल रक्कम आणि कामगारांचे वेतन अजून दिलेले नाही. सध्या शेतकरी व कामगार वर्ग कोरोना सारखा आजार, लॉकडाऊन तसेच अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात आहे,अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे चालू गळीत हंगाम चालू झाला तरी देण्यास तयार नाहीत त्यामुळे युगंधर संघटनेच्या वतीने कारखान्याच्या गेटवर घटस्थापना करून आई तुळजाभवानी शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे देण्याची सदबुद्धि करखाण्याच्या प्रशासनाला व्हावी हे साकडं घालून बेमुदत आंदोलन चालू आहे. शेतकऱ्यांचे एफ. आर. पी. प्रमाणे व्याजासाहित रक्कम खात्यावर जमा होत नाही तो पर्यंत आंदोलन चालू राहणार असा इशारा युगंधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल गुंड यांनी दिला आहे.
यावेळी आंदोलनामध्ये तानाजी काकडे, धनाजी कोकरे, रमजान शेख, संतोष गायकवाड, प्रमोद आठवले,सोमनाथ देवकाते, अनिल पाटिल, लखन खंदारे, अभिजित नेटके, जयप्रल्हाद मोरे, विजय सुतार,गणेश मोरे, आदी. सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी याठिकाणी बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments