राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना 100% प्रमाणे वेतन देणार - शिक्षण मंञी वर्षाताई गायकवाड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 14, 2020

राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना 100% प्रमाणे वेतन देणार - शिक्षण मंञी वर्षाताई गायकवाड

 राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना 100% प्रमाणे वेतन देणार - शिक्षण मंञी वर्षाताई गायकवाड

तुळजापूर, दि.१४(क.वृ.): राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांचा वेतनाची गंभीर समस्या असून, लवकरच 100% प्रमाणे वेतन देण्याचा प्रयत्न राहील  असे आश्वासन शिक्षण मंञी वर्षाताई गायकवाड यांनी दिले. राज्य नगरपालिका व महानगर पालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिक्षण मंञी गायकवाड यांनी मंगळवारी आयोजित केली होती. यावेळी त्यांनी आश्वासन दिले.

शिक्षण मंञी वर्षाताई गायकवाड म्हणाल्या, जिल्हा परिषद शिक्षकां प्रमाणे नपा व मनपा शिक्षकांसाठी आंतर जिल्हा ऑनलाईन बदली पोर्टल सुरु करण्यात येईल. तसेच ज्या नगरपरिषद व महानगर पालिकेने शिक्षकांना 7 वा वेतन आयोग अदयाप लागू केला नाही. त्याना सूचना देण्यात येईल. संघटनेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्य आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार सोहळ्यास लोणावळा येथे डिसेंबर महिन्यात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी राज्य महिला सदस्या सविता बोरसे, नंदा तांदळे, सुचिता ऐखे, ज्योत्स्ना भरडा, राज्य उपाध्यक्ष अशोक शेंडगे, मुंबई उपाध्यक्ष, कृपेश म्हाते, गंगाधर कोळी, वैभव पाटील, श्याम कोळी यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages