Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यात पावसाने मोठे नुकसान केले

तुळजापूर तालुक्यात पावसाने मोठे नुकसान केले



तुळजापूर, दि.१४(क.वृ.)तुळजापूर तालुक्यात मंगळवार राञी सुरु झालेला पाऊस बुधवार पर्यत धुवादार पणे बरसल्याने यत शहरासह ग्रामीण भागातील शेतीचे पिकाचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात सर्वञ पाणी पाणी झाला होते. श्रीतुळजाभवानी मंदीरासमोर पाणी निचरा करण्यासाठी टाकलेल्या लोखंडी जाळीमध्ये प्लास्टिक अडकल्याने पाणी राजमाता जिजाऊ महाध्दार येथे साचुन हे साचलेले. पाणी महाध्दार पायरीवरुन निंबिळकर दरवाजा मार्ग मंदीरात घुसले होते. नंतर नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालुन लोखंडी जाळीवरील प्लास्टिक काढल्याने महाध्दार समोरील पाणी निचरा नंतर वाहतुक महाध्दार समोरून वाहतूक सुरु झाली. 

या पावसामुळे तुळजापूर शहरातील तसेच अनेक गावातील रस्ते जलमय झाले होते. तर शेकडो कच्चा घरांचा भिंती या पावासात जमिन दोस्त झाल्या होत्या. तर अनेकांचा घरात पाणी घुसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. तर शेतकऱ्यांच्या शेतमाल व शेताचे ही यात मोठे नुकसान झाले. चिञा नक्षत्र सुरु होताच तालुक्यात पावसाचा जोर वाढला असुन यामुळे शेतकऱ्यांची अवस्था 'आई जेवु देईना बाप भिक मागू देईना' अशी झाली आहे. दुष्काळ  शेतमालाचे घसरणारे भाव कोरोना ही संकटे झेलत नुकसान सहन करीत कसेतरी दिवस काढत असलेल्या शेतकऱ्यांना माञा या अतिवृष्टीने चारीमुंड्या चित्त केले असुन या पावसामुळे बळीराजाचे नभूतोनभविष्यतो असे शेत व शेतमालाचे नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गावर अस्ममानी संकट ओढवले आहे. आता करावेच काय ! कुटुंबासह जगावे कसे असा प्रश्न बळीराजाला  पडला आहे. 

मंगळवार राञभर मध्यम स्वरुपाचा तर बुधवार तालुक्यास मुसळधार पावसाने झोडपुन काढले. यात तुळजापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. तर घरात पाणी घुसुन मोठे नुकसान झाले. शेकडो भिंती जमिन दोस्त झाल्या. 

या झालेल्या पावसात सिंदफळ येथे जीप वाहुन जात असताना भितीला अडल्याने ती वाहुन गेली नाही अनेक सोयाबीनच्या गंजी या पावसात झाकलेल्या प्लास्टिक सह वाहुन गेल्या, तुळजापूर तालुक्यात झालेल्या या पावसाने  नदी नाले ओढे पाण्याने भरभरून वाहिले. विहीरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. अक्षरशा जादा पैसे देवुन पाण्यात उभे असलेले सोयाबीन सध्या काढावे लागले आहे. तर ते पावसाचा पाण्यात भिजुन त्याचे वाटोळे झाले आहे. या होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन कांदा, तुर, ऊस, द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकरी चे मोठे नुकसान  झाले आहेत. सध्या तालुक्यात सर्वञ सोयाबीन काढणी अंतीम टप्प्यात असुन सोयाबीनचे काढलेले काड भिजत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच कांद्यावर विविध रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार बॅटिंग करत असल्याने ऊस देखील जमिनीवर आडवे झाले असून, कांद्याच्या वाप्यात पाणी थांबल्याने कांदा पिवळा पडत असून, शेतकऱ्याला या पावसाने चित्त केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments