अपंग बालकांना शासकीय संस्थेमध्ये मोफत प्रवेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 14, 2020

अपंग बालकांना शासकीय संस्थेमध्ये मोफत प्रवेश

अपंग बालकांना शासकीय संस्थेमध्ये मोफत प्रवेश


सोलापूरदि.१४(क.वृ.)महाराष्ट्र शासनाच्या अपंग कल्याण आयुक्तालयपुणे अंतर्गत अपंग (अस्थिव्यंग) बालकांसाठी मोफत शिक्षणवसतीगृह व गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्राक्रिया व कृत्रिम अवयव सुविधा पुरविणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय निवासी संस्था किल्ला भाग मिरज येथे कार्यरत असून 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन शासकीय अपंग बालकगृह व शाळेचे अधीक्षकांनी केले आहे. 

शिक्षण सुविधा 

  • संस्थेच्या परिसरात ली ते थीपर्यंतचे मोफत प्राथमिक शिक्षण 
  • इयत्ता वीपासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेपर्यंत.
  • माध्यमिक शाळेत जाणे येणेसाठी मोफत वाहतुकीची सुविधा.
  • पाठ्यपुस्तके, वह्याइतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत.
  • मुलींसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक.

वसतीगृह सुविधा

  • वसतीगृहात अपंग मुला-मुलींची स्वतंत्र निवास व्यवस्था आणि मोफत जेवण.
  • प्रत्येक विद्यार्थ्यांना कॉटगादीबिछाना आणि इतर साहित्याचा मोफत पुरवठा.
  • दररोज अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय
  • शुद्ध व थंडगार पिण्याच्या पाण्याची सुविधा

शस्त्रक्रिया भौतिकोपचार सुविधा

  • अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गरजेनुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा.
  • गरजेनुसार कृत्रिम अवयवकुबड्यातीन चाकी सायकल वाटप.

 प्रवेशाबाबत अटी

  • विद्यार्थी अस्थिव्यंग असला पाहिजे.
  • वयोगट ते 14 वर्षे.
  • प्रवेश अर्जासोबत सिव्हील सर्जन यांनी दिलेल्या अपंगत्वाचा दाखलाशाळा सोडल्याचा दाखलाउत्पन्नाचा दाखलातीन फोटो. 
  • प्रवेश अर्ज व माहितीपत्रक समक्ष अथवा पोस्टाद्वारे मोफत मिळतील. 

अधिक माहितीसाठी अधीक्षकशासकीय अपंग बालगृह व शाळाकिल्ला भागबी.एस.एन.एल ऑफिस शेजारीमिरज- 416410 (संपर्क क्र- 9325555981, 9860642680, 9422216459, 9130448195)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages