मराठ्यांचे बुधवार दि.१६ रोजी बोंबाबोंब आंदोलन

तुळजापूर दि.१४(क.वृ.):- मराठा आरक्षणाला सर्वाच्य न्यायालयाने स्थगित दिल्याचा पार्श्वभूमीवर सोमवार दि.14 रोजी सकल मराठा समाज बांधवांची श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ मंगल कार्यालयात बैठक होवुन यात प्रथमता बुधवार दिनांक १६ रोजी बोंबाबोंब आंदोलन करुन आंदोलनाचे रणशिंग फुकण्याचा निर्णय झाला. या उपर ही स्थगिती उठविण्यास हालचाली झाल्या नाहीतर माञ आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या आंदोलनात सर्व शिवभक्त सकल मराठा समाज, महिला, डाॅकटर, वकील, इंजिनिअर, व सामाजिक राजकिय कार्यकर्ते विद्यार्थी बांधव यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन.
या बैठकीस तुळजापूर नगरीचे नगर अध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी. पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, जिवणराजे इंगळे, अर्जुन आप्पा साळुंके आबासाहेब कापसे, महेश गवळी, महेश चोपदार, अजय भैय्या साळुंके, प्रतिक रोचकरी, बालाजी जाधव, सागर इंगळे, सुहास गायकवाड, विजय भोसले, कुमार टोले, मयुर कदम, आनंद काळे, प्रशांत अपराध, शिवाजी वसंत जोतं प्रशांत सोंजी, महेश धुमाळ, विशाल मगर, आण्णासाहेब क्षीरसागर, मारूती जाधव, अदि उपस्थितीत होते.
0 Comments