फळ व भाजीपाला विक्रेत्यांना मास्क व हॅन्डसानीटायझर चे मोफत वाटप...

सोलापूर दि.१३(क.वृ.): आज कोरोना या महारोगाच्या पार्श्वभूमीवर जुना विडी घरकुल, येथील फळ व भाजीपाला विक्रेत्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रा.गणेश लेंगरे यांनी आपल्या स्वखर्चाने पर्यावरणपूरक पुर्नवापर करता येतील असे चांगल्या दर्जाचे कापडी टिकाऊ मास्क व हॅन्ड सानीटायझरचे जुना विडी घरकुल नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किशन पवार यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ.पवार यांनी कोरोना विषाणू बाबत घ्यावयाची खबरदारी या विषयी फळ व भाजीपाला विक्रेत्यांना मार्गदर्शन केले व प्रा.लेंगरे यांचे अभिनंदन केले.
यावेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबवत असल्याचे प्रा.लेंगरे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी सलीम कोरबु, रवींद्र भोजने, किरण पल्ली, आदी उपस्थित होते.
0 Comments