Hot Posts

6/recent/ticker-posts

माहेरचे ऋण फेडण्याचा प्रयत्न : नुतन जाजू

माहेरचे ऋण फेडण्याचा प्रयत्न : नुतन जाजू 


वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून चौघीना शिष्यवृत्ती

सोलापूर दि.१३(क.वृ.): सध्या लॉकडाऊनमुळे समाजातील सगळेच घटक संकटात आहेत. त्यातून शिक्षण घेणारे विद्यार्थीही सुटले नाहीत. शिक्षण घेताना त्यांना अनंत अडचणी येत आहेत. मी जरी आज सासरी राहत असले तरी सोलापूरचे माझ्यावर ऋण आहेत. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन ते ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन उदयोजिका नुतन पवन जाजू (बंगलुरू) यांनी केले. 

गरजू, गरीब व हुशार अशा चार विद्यार्थ्यानींना नुतन जाजू यांच्या दातृत्वातून व वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून शिष्यवृत्ती देताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर समाजसेवक व नीलकंठ बँकेचे संचालक जयनारायण भुतडा, प्राची भुतडा, भारती भुतडा, उद्योगपती दीपक पाटील, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उपस्थित होते.

हिराचंद नेमचंद महाविद्यालयात बीबीएच्या द्वितीय वर्षात शिकणारी स्नेहल लकशेट्टी, औरंगाबाद येथे बीएससीच्या (कृषी) चौथ्या वर्षात शिकणारी कावेरी मेरु, श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकणारी भाग्यश्री वडतिले, दहावी मध्ये 98 टक्के गुण घेऊन अकरावी मध्ये प्रवेश घेतलेली प्रांजली रामपुरे या चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश यावेळी नूतन जाजू यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

यावेळी जय नारायण भुतडा म्हणाले की गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे आज महागडे झाले आहे. अशा परिस्थितीत शिक्षणासाठी मदतीची भूमिका व दानत्व असणाऱ्या नुतन जाजू सारख्या माहेरवाशिणी आणि माध्यम म्हणून काम करणाऱ्या वीरशैव व्हीजनसारख्या संस्थांची गरज आज समाजाला आहे. त्यामुळे सोलापूरच्या विकासाला हातभार लागू शकतो.

यावेळी प्रशांत रामपुरे,  श्रीमंत मेरू, संगीता लकशेट्टी, शोभा वडतीले आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments