Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त भोर उपविभागातील वनरक्षक कै.सदाशिव त्रयंबकआप्पा नागठाणे यांचा गौरव

राष्ट्रीय वन हुतात्मा  दिनानिमित्त भोर उपविभागातील वनरक्षक  कै. सदाशिव त्रयंबकआप्पा नागठाणे यांचा गौरव


पुणे दि.१३(क.वृ.):- वन आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाचे कर्तव्य बजावित असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या वन अधिकारी / वन कर्मचारी यांच्या  स्मरणार्थ दरवषी 11 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय वन हुतात्मा दिन म्हणून केंद्र शासनामार्फत जाहीर करण्यात आलेला आहे. वन आणि वन्यजीवन संवर्धनाचे कर्तव्य बजावित असताना ज्यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे अशा देशातील 13 वन अधिकारी / वन कर्मचारी यांना पर्यावरण , वन व वातावरण बदल मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांच्याद्वारा राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डिजीटल प्रमाणपत्र देण्यात आले.

राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त्‍ यावर्षी 11 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला महानिदेशक श्री.गुप्ता यांनी हुतात्मा दिन साजरा करण्याची पार्श्वभूमी विशद केली. पर्यावरण, वने व वातावरण बदल विभागाचे केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर यांनी वन हुतात्म्यांनी प्राणाची बाजी लावून वनसंरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे ण व्यक्त करुन त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त्‍ केली.तसेच पर्यावरण, वने व वातावरण बदल विभागाचे राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी सर्वांना संबोधित केले. सन 2019-20 मधील 13 वन हुतात्मांच्या नावांची घोषणा करण्यात येवून त्यांना डिजीटल प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय 12 वन हुतात्म्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात सन 1935 पासून आजवर 28 वन कर्मचारी / वन अधिकारी यांनी वनांचे संरक्षण करताना आपले बलिदान दिले आहे. पुणे वनवृत्तातील भोर उपविभागांतर्गत कार्यरत असलेले कै. सदाशिव त्रयंबकआप्पा नागठाणे,वनरक्षक (चांदवणे) हे दि.28 डिसेंबर 2017 रोजी त्यांच्या वनक्षेत्रातील वनवणवा नियंत्रणात आणताना गंभीररित्या भाजून जखमी झाले व दि.3 जानेवारी 2018 रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वन विभागामार्फत वन हुतात्मा कै. सदाशिव त्रयंबकआप्पा नागठाणे,वनरक्षक ( चांदवणे) यांच्या पत्नी श्रीमती अर्चना सदाशिव नागठाणे यांना उपविभागीय वन अधिकारी यांच्या कार्यालयात लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली असून सध्या त्या तेथे कार्यरत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments