Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूरकर जागे कधी होणार !

तुळजापूरकर जागे कधी होणार !

तुळजापूर दि.१३(क.वृ.):- वाढत चाललेला कोरोना पार्श्वभूमीवर रविवारी पुकारलेल्या जनता कर्फ्यु  संमिञ प्रतिसाद लाभला. गेलीआठ दिवसा पासुन शहरात चिंताजनक असे रुग्ण वाढत असुन मयत संखेत ही वाढ होत आहे. शहरवासिय वाढत्या कोरोना संखेच्या पार्श्वभूमीवर घाबरुन गेले असुन क्वारटांईन सेंन्टर कोविड रुग्णालय ही रुग्णांनी गजबजुन गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर रविवार दि.१३ चा कफ्र्यु कडक पाळला जाईल अशी अपेक्षा होते माञ काही विघ्नसंतोषी मंडळी मुक्त पणे वावरत होते तर काही घोळक्याने बसुन होते या पार्श्वभूमीवर तुळजापूर करांना जाग कशी येणार अशा प्रश्न निर्माण होतो. शहरातील डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर बसस्थानक मांदीर महाध्दार समोरील परिसरात काही मंडळी फिरत असल्याचे दिसुन आले. नव्वद  टक्के लोक कोरोना बाबतीत शाषण आदैशाचे पालन तंतोतंत करतात माञ दहा टक्के लोक पालन करीत नसल्याने कोरोना रोखण्यात अडथळे येत असल्याचे समजते.

व्यापारी वर्गाने माञ आपले व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवल्याचे दिसुन आले. अशी जर परिस्थिती असेल तर कोरोना थांबणार कधी मंदीर उघडले जाणार कधी. बसस्थानक मध्ये प्रवाशांची रेलचेल दिसुन आली. तर श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार समोर ही बाहेर गावातील भक्त मंडळीचा वावर आज दिसुन आला. या पुर्वीचे शनिवारी पुकारलेल्या जनता कर्फ्युस मोठा प्रतिसाद लाभला होता माञ रविवार चा जनता कर्फ्यु तितकसा प्रभावी दिसुन आला नाही.

Reactions

Post a Comment

0 Comments