Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरातण भगवती विहीर श्रमदानातुन युवकांनी केली स्वच्छ

पुरातण भगवती विहीर श्रमदानातुन युवकांनी केली स्वच्छ

तुळजापूर दि.१२(क.वृ.): तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील पुरातन अतिप्राचीन दगडी बांधकाम केलेली विहीरीत घाणीचे साम्राज्य पसरले होते ही पुरातण विहर शहरातील कमान वेस भागातील जय अंबिकामंडळाचा सदस्यांनी स्वछ केल्याने या विहीरीतील पाण्याचा वापर उन्हाळ्यात भाविक व नागरिकांना करता येणार आहे.

पुरातन भगवती विहीर  ही श्रीतुळजाभवानी मंदीराकडे जाणाऱ्या मुख्य रस्ता लगत आहे. त्यामुळे रस्त्यावर येणारृ जाणारी मंडळी यात पुजेचे साहित्य सह अन्य कचरा सारखे पदार्थ टाकत असल्याने यातील पाणी अस्वछ दिसत होते पाण्यावर शेवाळे निर्माण झाले होते . पाण्याला वास येत होता.

या पार्श्वभूमीवर शहरातील जय अंबिका मंडळाचे  अध्यक्ष राजेश्वर कदम, करन कदम, शुभम भिसे, नागेश कदम, बाळासाहेब भिसे, काळू शेख, ओमकार भिसे, पवन कदम, राहुल चिवचिवे, बंटी कदम, करण परदेशी, अर्जुन परदेशी, अदिनी  विहीरात पडलेलार कचरा उलला व शेवाळ काढुन टाकुन विहीर स्वछ केले त्या मुळे आता या विहीरीतील पाण्याचा वापर शहरवासियांन सह भाविकांना करता येणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments