आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते होटगी येथील तलावाचे जलपूजन


सोलापूर दि.३१(क.वृ.): आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते रविवारी होटगी येथील तलावाचे जलपूजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार अमोल कुंभार, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, दक्षिण तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, अंबिका पाटील, सचिन चिवडशेट्टी व गावकरी उपस्थित होते. तत्पूर्वी आ. देशमुख यांनी सोलापुरात शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत शशी थोरात महेश देवकर, शिरीष पाटील, सागर अतनुरे, बसू तोडकर, प्रथमेश जाधव आदी उपस्थित होते.
0 Comments