Hot Posts

6/recent/ticker-posts

अश्विनी वाकडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपादन केले यश

अश्विनी वाकडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपादन केले यश


माढा दि.३१(क.वृ.)उपळाई बुद्रुक येथील कन्या अश्विनी वाकडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार उपळाई बुद्रुक येथे पुण्याचे आयकर उपायुक्त स्वप्नील पाटील व त्यांच्या पत्नी प्रियंका पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 
यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तानाजी वाकडे यांचादेखील सत्कार करण्यात आला. 
यावेळी आयएएस वाकडे म्हणाल्या की, अपयश आल्यानंतर देखील जिद्द व चिकाटीने अभ्यास केला. कुटुंबाचे मार्गदर्शन व पाठिंबा सतत असल्याने व गावातील सर्व अधिकाऱ्यांची प्रेरणा घेऊन या पदापर्यंत मी मजल मारू शकले. ग्रामीण भागातील मुलांनी अपयश आल्यानंतर देखील न थांबता प्रयत्न करत आहेत यश नक्की मिळते असे म्हणाल्या. 
या कार्यक्रमास प्रगतशील बागायतदार शरद पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख, सुधिर शेटे, बंडु जाधव, गणेश गुंड, गोरख वाकडे, अजय देशमुख आदि जण उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments