अकलूज व परिसरात १० दिवसाचा लॉकडाऊन करणे गरजेचे आहे- सुधीर रास्ते
अकलूज दि.३१(क.वृ.): कोरोनाची साखळी तोडणेसाठी अकलुज व परिसरात सलग १० दिवसाचा कडक लाॅकडाऊन करणे गरजेचे आहे असे मत सोलापूर जिल्हा जनसेवा संघटनेचे सरचिटणीस सुधीर रास्ते यांनी पत्रकारांशी सवांद साधताना व्यक्त केले. पुढे बोलताना रास्ते म्हणाले की अकलुज व परिसरात कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे. हा व्हायरस प्रसार होऊन दररोज ५० ते ६० रुग्ण पॉझिटिव्ह होत आहेत. सुमारे ५०० पेक्षा जास्त रूग्ण फक्त अकलुज परिसरामध्ये झाले आहेत.अकलुज मध्ये सद्या या विषाणुला अटकाव करणेचा कोणताही अजेंडा दिसुन येत नाही. महाराष्ट्र शासन, ग्रामपंचायत प्रशासन अत्यंत हतबल झालेले दिसत आहे. असेच चालु राहीले तर महाराष्ट्र किंबहूना देशातील सर्वात जास्त कोरोनाचे रूग्ण अकलुजमध्ये असतील (लोकसंख्येच्या प्रमाणात) प्रशासन जनतेला फक्त काळजी घ्या एवढेच सांगून मोकळे झाले आहे. अकलुज मधील बाजार पेठे मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे यामध्ये लोक कसलाही सोशल डिस्टेंन्स व इतर नियम न पाळता बिगर मास्कचे फिरत आहेत. यावर कसलेही नियंत्रण नाही.
अकलुज मेडिकल हब आहे यामुळे परिसरातील सर्वच तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात कोरोनाचे पेशंट अकलुजला अडमीत होण्यासाठी येत आहेत. यामुळे अकलुजच्या मेडिकल यंत्रणेवर मोठा भार वाढत आहे. यामुळे अकलुज व परिसरातील कोरोना रूग्णांना बेड मिळत नसलेने या स्थानिक पेशंटचे पण हाल होत आहेत. अकलुज मधील नामांकीत हाॅस्पीटल मधील अनेक डाॅक्टर व त्यांचे सहकारी स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे.काही ठिकाणी तर संपूर्ण स्टाफला कोरोना झाला आहे. यामुळे अकलुज मधील आरोग्य यंत्रणा पण कोलमडून जायच्या स्थितीत आली आहे. कोरोणाची लागण झालेले शेकडो रुग्ण अकलुज मध्ये मोकळे फिरत आहेत कारण त्यांनाच माहित नाही की ते कोरोना पॉझिटीव्ह आहेत म्हणून आणि यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊन आणखी भयंकर स्थिती निर्माण होण्याची शक्यता काही नामांकीत डाॅक्टर बोलुन दाखवत आहेत.
यावर आता एकच उपाय म्हणजे घरोघरी जाऊन तपासणी प्रमाण वाढवणे व अकलुज शहर व परिसरात दहा दिवसाचा एकत्र व कडक लॉकडाऊन घेऊन ही चैन तोडणे गरजेचे आहे. सध्या रोज ५० ते ६० रुग्ण बाधित होत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार असेच चालु राहीले तर दररोज मोठ्या प्रमाणात लोक पॉझिटिव निघतील म्हणुन आजच आपण १० दिवसाचा लॉकडाऊन घेऊन हि चैन तोडणे गरजेचे आहे.
सध्याची परीस्थिती पण फार गंभीर आहे यावर वेळीच योग्य अशी उपाययोजना केली नाही तर आणखी गंभीर होऊन परीस्थिती हाताबाहेर जाणेची शक्यता आहे. तरी अकलुज प्रांताधिकारी, माळशिरस तहसीलदार, शंकरनगर ग्रामपंचायत, संग्रामनगर ग्रामपंचायत व या परिसरातील व सर्व पक्षाचे पदाधिकारी व व्यापारी बंधु यानी एकत्र येऊन हा लाॅकडाऊन चा लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे
सुधीर रास्ते म्हणाले.
0 Comments