ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभरामुळेच टेंभुर्णीत कोरोनाचा वाढता प्रभाव - भा.ज.प. तालुका अध्यक्ष योगेश बोबडे

टेंभुर्णी दि.३१(क.वृ.): सध्या टेंभुर्णीत कोरोनाच्या रुग्ण संकेत वाढ होत असून अशा परिस्थितीत टेंभुर्णी शहरामध्ये कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या पाहिजेत पण फक्त राजकारणा पुरते जनतेचा वापर करणारे टेंभुर्णी येथील पुढारी व ग्रामपंचायत प्रशासन हतबल असल्याने अटकेपार ग्रुपने टेंभुर्णी शहरात निरजंतुकीकरन फवारणीचा योग्य मोका साधलाआहे या वेळेस खरी गरज आहे टेंभुर्णी च्या पाच नंबर वार्ड क्रमांक मध्ये फवारणी करून अटकेपार झेंडा ग्रुपने एक चांगला उपक्रम राबवला आहे.
टेंभुर्णी येथे निरजंतुकीकरन फवारणी ट्रॅक्टरचे पूजन टेंभुर्णी चे गटनेते अॕड कृष्णात बोबडे यांच्या हस्ते भवानी मंदीरात श्री फळ फोडून उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी भा.ज.प.चे. माढा तालुका नुतन अध्यक्ष योगेश बोबडे हे बोलत होते.
या वेळेस आर पी आय निकाळजे गटाचे जिल्हा अध्यक्ष जयवंत पोळ,आठवले गटाचे परमेश्वर खरात,नागेश बोबडे,संयोजक तथा प्रभाग पाच मधील ग्रामपंचायत सदस्य भाऊ महाडिक,सदस्य बापू वाघे,विकास धोत्रे,टेंभुर्णी प्रेस क्लब चे अध्यक्ष सोपान ढगे,भारत थोरात,बाळासो सपाटे,योगेश भणगे,भीमराव भरगंडे सर,दयानंद महाडिक,तेजस निंबाळकर,माजी सरपंच श्रीकांत लोंढे,चेअरमन नवनाथ शिंदे,गौतम कांबळे,निलेश मुसळे,दत्ता सावंत,नागनाथ शिंदे,दत्ता कोल्हे,माजी शिव-सेना शहर प्रमुख किशोर नाळे,बाबा महाडिक,भारत जगताप,विजय ढगे,भारत थोरात,मुन्ना महाडिक,पंकज देशमुख,जयराम देशमुख,जयवंत महाडिक,भाऊ थोरात,पांडुरंग महाडिक,रमेश देशमुख,अमित खटके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच फवारणी करण्यासाठी दत्ता जाधव,सूर्यकांत थोरात,गोपाळ जगताप, गणेश पराडे,सलीम तांबोळी यांनी परिश्रम घेतले.
खडके वस्ती,महाडिक वस्ती,कोष्टी गल्ली,चांदगुडे वस्ती,कोल्हे वस्ती,बस स्थानक मागील परिसर,कुर्डुवाडी रोड व ब्रिजचा भाग,कुटे वस्ती,नाळे वस्ती,गोरे वस्ती,ग्रामपंचायत कार्यालया मागील परिसर,हॉटेल सुमित परिसर आदी भागात फवारणी करण्यात आली.
0 Comments