श्रीगणेशाचे संकलन करुन नगरपरिषद विधीवत विसर्जन करणार - नगराध्यक्ष सचिन रोचकरी

तुळजापूर दि. ३१(क.वृ.):- कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगाची प्रतिबंधक उपाययोजना म्हणून नगरपरिषद वतीने श्रीगणेश मुर्तीचे संकलन करुन या श्रीगणेश मुर्ती विधीवत विसर्जन करण्यात येणार असल्याची माहीती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली.
कोरोनाचा प्रसार होवु नये म्हणून नगरपरिषद वतीने श्रीगणेश विसर्जन पार्श्वभूमीवर मंगळवार दि.1 रोजी शहरातील झुंजार हनुमान मंदीर दिपक चौक पावणारा गणपती चौक शुक्रवार पेठ हाडको बाग हाडको डुल्या मारुती मंदीर कमानवेस मंठाळकर मंगल कार्यालय नळदुर्ग रोड श्रीतुळजाभवानी मंदीर तुळजापूर खुर्द पाचुंदा तलाव येथे श्रीगणेश मुर्तीचे संकलन करुन या मुर्ती वाहनातुन नेऊन विधीवत पाचुंदा तलाव व मोर्डा रस्त्यावर असणाऱ्या दगडी खाण तलावात विसर्जन करण्यात येणार आहे तरी शहरवासियांनी श्री गणेश मुर्ती खालील ठिकाणी आणुन देवुन नगरपरिषद स सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले आहे.
0 Comments